हैदराबाद : 2024 मध्ये जागतिक तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या पातळीपेक्षा पहिल्यांदाच 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्याचं दिसून आलंय. त्यामुळं शास्त्रज्ञांनी यावर चिंता वक्त केलीय. 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गंभीर पृथ्वीसाठी धोका असल्यामुळं आपल्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झालीय. या तापमान वाढीमागील मुख्य कारण म्हणजे वातावरणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन, जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड आणि औद्योगिक प्रक्रिया यासारख्या मानवीचुकामुळं झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे.
1.5 अंश सेल्सिअस तापमान वाढ
या मध्ये 2015 मध्ये 200 देशांनी पॅरिस करार केला होता. तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सहमती दर्शवली होती. यावेळी 1.5 अंश सेल्सिअसच्या तापमान वाढीची मर्यादा पॅरीस करारात घालून देण्यात आली आहे. ही मर्यादा ओलंडल्या हवामान घटनांचे परिणाम मानवाला भोगावे लागतील असं, असं म्हटंलय. IPCC नुसार, (The Intergovernmental Panel on Climate Change) ही मर्यादा ओलांडल्यास समुद्राच्या तापमानातसह परिसंस्थांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता वाढते. IPCC च्या विशेष अहवालात 1.5 अंश सेल्सिअस जागतिक तापमानवाढीमुळं दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटांचे धोके वाढवू शकता, असा दावा करण्यात आला आहे.
काय आहेत तापमान वाढीची कारणे
जागतीकर तापमान वाढीमागे अनेक कारणांचा समावेश आहे. मात्र, यात काही मुख्य कारण आहेत. कार्बन डायऑक्साइड (CO₂), मिथेन (CH₄) आणि नायट्रस ऑक्साईड (N₂O) सारख्या हरितगृह वायूंच्या वाढत्या वापरामुळं तापमान वाढ होतेय. हे वायू पृथ्वीच्या वातावरणात उष्णता पकडून ठेवतात, ज्यामुळं जागतिक तापमानवाढ होते. मानवी चुकामुळं या वायूंची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
- जीवाश्म इंधन जाळणे :ऊर्जा आणि वाहतुकीसाठी कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूचं ज्वलन हे CO₂ उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत आहे. त्यामुळं जागतिक तापमान वाढ झपाट्यानं होतेय.
- जंगलतोड :शेती किंवा शहरी विकासासाठी जंगलतोड केल्यानं वातावरणातील कार्बनची पातळी वाढते.
- औद्योगिक कारणं : विविध कंपन्या उत्पादन करताना विविध हरितगृह वायू हवेत सोडतात, ज्यामुळं एकूण तापमानवाढ झपाट्यानं वाढतेय.
PLOS ONE मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, जमीन आणि महासागराच्या तापमानवाढीमुळं उत्तर गोलार्धातील अनेक खंडीय प्रदेश जागतिक सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमानवाढ होतं आहे. त्यामुळं जागतिक तापमान वाढीचे परिणाम यावरून अधोरेखित होतात.
1.5°C पेक्षा जास्त तापमान वाढण्याचे परिणाम
1.5°C पेक्षा जास्त तापमान वाढल्यानं विविध हानिकारक परिणाम होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
अतिवृष्टी : 1.5°C पेक्षा जास्त तापमान वाढीमुळं उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळं आणि जंगलात वणवे (आग) लागण्याच्या प्रकणात वाढ होतेय. उदाहरणार्थ, वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनच्या अलीकडील अभ्यासात, मानवनिर्मित हवामान बदलामुळं दक्षिण कॅलिफोर्नियातील वणव्यांच्या घटनात वाढ झालीय. ज्यामुळं आगीमुळे होणाऱ्या हवामानची तीव्रता अनुक्रमे 35% आणि 6% नं वाढली आहे.
समुद्राच्या पातळीत वाढ :तापमानवाढीमुळं हिमनद्यांचं जलद वितळण होतंय. त्यामुळं समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होतेय. ज्यामुळं जगभरात समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या समुदायांना धोका निर्माण होतो. नेचर मधील एका लेखात, हवामान बदलामुळं समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्याचे सागरी जीवावर गंभीर परिणाम होत आहे. तसंच काही बेटं पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण झालीय.