महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुण उद्योजकानं बनवली दिव्यांगांना सहारा देणारी सारथी 'ई व्हीलचेअर'; वैशिष्ट्य काय? घ्या जाणून सविस्तर - Saarthi E Wheelchair

Saarthi E Wheelchair : दिव्यांग किंवा हालचाल न करता येणाऱ्या अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींना इतरांची मदत न घेता, कुठेही जाता येत नाही. अशा लोकांचं आयुष्य स्वावलंबी व्हावं. त्यांनाही इतरांसारखं आनंदी जीवन जगता यावं. म्हणून पुण्यातील महेश बैकारे आणि त्यांच्या मित्राने दिव्यांगांना उपयुक्त असणारी 'सारथी ई व्हीलचेअर' बनविली आहे.

E Wheelchair
ई व्हीलचेअर (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 2:17 PM IST

Updated : Aug 8, 2024, 2:25 PM IST

पुणेSaarthi E Wheelchair : समाजात जगत असताना दिव्यांगांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. तसंच विविध सामाजिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. व्हीलचेअर असताना देखील या दिव्यागं लोकांना व्हीलचेअर चालवणं तसंच ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणाच्यातरी मदतीची गरज लागते. हीच बाब लक्षात घेवून पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी दिव्यांगांना उपयोगी अशी 'सारथी ई व्हीलचेअर' बनवली आहे. ही चेअर चार्जिंग केल्यावर जवळपास 40 किमी चालते आणि नंतर सहज फोल्ड करून ठेवता येते.

ई व्हीलचेअरची माहिती देताना महेश बैकारे (ETV BHARAT Reporter)


'मेड इन इंडिया' ई व्हीलचेअर :पुण्यातील महेश बैकारे आणि त्याच्या एका मित्राने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून दोन वर्ष एका कंपनीत काम केलं. त्यानंतर त्यांनी स्वतः ची एक एग्लेन्स सारथी नावाची कंपनी सुरू केली. दिव्यांग लोकांच्या समस्या लक्षात घेवून त्यांनी एक सारथी नावाची ई व्हीलचेअर बनविली. जी पूर्णपणे 'मेड इन इंडिया' आहे. व्हीलचेअरला चार्जिंग केल्यावर जवळपास 40 किमी पर्यंत ती चालते. त्याचबरोबर ही ई व्हीलचेअर पूर्णपणे फोल्ड होते आणि सहज कोणालाही हाताळता येते.

अशी बनवली सारथी व्हीलचेअर :याबाबत महेश म्हणाले, "मी आणि माझा मित्र डिप्लोमा करायला वाडिया कॉलेजमध्ये येथे एकत्र होतो. तेव्हा आम्ही अकॅडमिक प्रोजेक्ट बनवला होता. जो सोलारवर व्हीलचेअरच्या बाबत होता. यानंतर इंजिनीअरिंग करत असताना बारामतीत एका प्रदर्शनात बोलावण्यात आलं होतं. तिथं लोकांनी विचारपूस केली. पण तेव्हा आम्ही फक्त प्रोजेक्ट बनवला होता. त्यानंतर एका कंपनीत दोन वर्ष काम केलं आणि मग स्वतःची कंपनी सुरू करून सारथी व्हीलचेअर बनवली." यासाठी 2021 पासून काम करायला सुरूवात केली आणि तीन वर्षाच्या अथक प्रयत्नांच्यानंतर ई व्हीलचेअर बनवली असंही ते म्हणाले.

अशा पद्धतीची ई व्हीलचेअर भारतात बनत नाहीत. विदेशातून ती इम्पोर्ट करावी लागते आणि त्याची किंमत देखील खूप आहे. पण आम्ही फक्त 96 हजार रुपयात ही व्हीलचेअर बनवून देतो.आत्तापर्यंत 5 ते दहा लोकांनी ही व्हीलचेअर घेतली आहे. पूर्णपणे फोल्ड होणारी ही व्हीलचेअर असून कुठेही सहज आपल्याला तिची ने आण करता येते. रस्त्यावर देखील ही ई व्हीलचेअर चालवता येते. सारथी ई व्हीलचेअर कुठेही सहजरीत्या घेऊन जाऊ शकतो.- महेश बैकारे, डायरेक्टर एग्लेन्स सारथी

लवकरच मिळणार पेटेंड : सारथी ई व्हीलचेअरला एकदा चार्जिंग केल्यावर ती 40 किलोमीटर जाते. याच्या पेटंटसाठी आम्ही मागणी केली आहे. तर आता लवकरच आम्हाला पेटंट मिळणार आहे. सुरूवातीला आम्हाला प्रयासकडून 10 लाख रुपयांचा निधी मिळाल्याचं महेश यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. वर्ध्याच्या दिव्यांग तरुणाला 'बिग बीं'नी दिली अविस्मरणीय भेट; पाहा स्पेशल रिपोर्ट
  2. Wheelchair Basketball Game : व्हिलचेअरवर बसून बास्केटबॉल खेळणारा देशातील सर्वात लहान खेळाडू
  3. National Wheelchair Rugby Tournament : व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र विजयी
Last Updated : Aug 8, 2024, 2:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details