महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनाप्रमुख असताना माझ्यासारखा कार्यकर्ता पैशांविना आमदार झाला, त्यांची आता लेना बँक - संजय शिरसाट - SANJAY SHIRSAT ON THACKERAY

ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. ती मंडळी काल आली आणि आज पळूनही गेली, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय.

State Social Justice Minister Sanjay Shirsat
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2025, 12:56 PM IST

Updated : Feb 25, 2025, 1:24 PM IST

मुंबई-पूर्वी शिवसेनाप्रमुख असताना परिस्थिती वेगळी होती, आता त्यांची लेना बँक झाली आहे, त्यांना देना बँक माहीत नाही, असा टोला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लगावलाय. पूर्वी असे होत नव्हते, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिले जात असे. पक्षाचे तिकीट पक्षाचे काम करणाऱ्यांना दिले जात असे. ही कार्यकर्त्यांना एक संधी असते. परंतु या लोकांनी ठरवून तिकिटे विकलीत. माझ्या मतदारसंघात चार जणांना अशाच प्रकारे तिकिटे देण्यात आलीत. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही. ती मंडळी काल आली आणि आज पळूनही गेली, असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. ते मुंबईत बोलत होते.

मर्सिडीज हा छोटा प्रकार आहे- शिरसाट : आता शिवसेनेत पैसे दिल्याशिवाय तिकीट द्यायचे नाही, अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्याचा परिणाम होऊन या निवडणुकीत त्यांना जनतेने जागा दाखवून दिली. मर्सिडीज हा छोटा प्रकार आहे. आता पैशांचे व्यवहार चालतात. गडाख सारख्या अपक्ष आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. शिवसेनाप्रमुख असताना असे प्रकार होत नव्हते. माझ्यासारखा कार्यकर्ता पैशांविना आमदार झालेला आहे. शिवसेनाप्रमुख मला विचारायचे बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का, मी तुला मदत करतो म्हणायचे. यांच्याकडे आता लेना बँक आहे, देना बँक नाही म्हणून यांनी जे जे काही घेतले त्याची माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली. त्या महिला आहेत म्हणून त्यांना इतके बोलायचे का, असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केलाय.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Source- ETV Bharat)

राज ठाकरे बोलले यांना खोके नाही, कंटेनर लागतात- शिरसाट : नारायण राणेंच्या आरोपांना उत्तर द्यावे, तुमची विहिर किती मोठी आहे, किती टाकायचे त्याच्यात, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. राज ठाकरे बोलले यांना खोके नाही, कंटेनर लागतात. एकनाथ शिंदेंनी दिले आहे. त्यांनी अजून तोंड उघडलेले नाही. किती पैसे घेतले, कोणत्या गाडीतून दिले हे ते सांगू शकतील, असा इशारा त्यांनी दिला. तुमच्याकडे नीतिमत्ता, निष्ठेला महत्त्व राहिलेले नाही, केवळ पैशांना महत्त्व आलंय. संजय राऊतांनी महिलेचा अपमान केला आहे, तुम्हाला त्याची फळे भोगावी लागतील. जे चाललंय त्यामुळे पक्षातून रोज माणसे बाहेर चालली आहे, असंही शिरसाट म्हणालेत.


हेही वाचा :

  1. छावा चित्रपट प्रदर्शनाआधी वादाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता!, संभाजी राजेंनी केली दिग्दर्शकांना 'ही' विनंती
  2. नागपूर थिएटरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात 'छावा' पाहण्यासाठी पोहोचला चाहता, व्हिडिओ व्हायरल...
Last Updated : Feb 25, 2025, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details