महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आज हात में गोली है', आगली बार खोपडी में डालुंगा', मुख्यमंत्रीच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाला धमकी - Threatening Note - THREATENING NOTE

Threatening Note : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे (Vikas Repale) यांना धमकीचं कुरियर आलंय. त्यात दोन जिवंत काडतूस आणि धमकीची चिठ्ठी आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Threatened Vikas Repale
माजी नगरसेवकाला धमकी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 10:45 PM IST

ठाणे Threatening Note: 'जास्त चरबी आलेली आहे काय?, हा छोटासा नमुना आहे. नंतर मोठा धमाका करू, आज दोन बुलेट हातात आहेत, उद्या डोक्यात मारीन' अशी धमकी माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना देण्यात आली आहे. या कुरियरमध्ये दोन जिवंत काडतुसे आणि धमकीची चिट्ठी आल्याची तक्रार विकास रेपाळे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर केली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस कुरियर घेऊन येणाऱ्या कुरियर बॉयचा शोध घेत आहेत.



माजी नगरसेवक रेपाळे यांना धमकी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय विकास रेपाळे यांना धमकीचं कुरियर आलंय. फिर्यादी विकास कृष्णा रेपाळे (४५) हे वागळे इस्टेट येथे राहणारे आहेत. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११-३० वाजण्याच्या सुमारास विकास रेपाळे यांचे एकूण तीन पार्सल आले होते. यात दोन अमेझॉन कुरियर होते जे स्वतः विकास रेपाळे यांनी मागवले होते. तर तिसरे कुरियर हे डी.टी.डी.सीचे होते. हे सर्व पार्सल विकास रेपाळे यांच्या मातोश्री यांनी स्वीकारून रेपाळे याचं कार्यालयात ठेवलं.

कुरियरमध्ये आली धमकीची चिठ्ठी :१ अक्टोबार रोजी दुपारी स्वतः विकास रेपाळे यांनी पार्सल उघडलं आणि त्यांना धक्का बसला. सदरचे पार्सल हे डी.टी.डी.सी कुरिअर कंपनीकडून आलं होतं. ते उघडून पाहिलं असता, वरील कव्हरच्या आतमध्ये नटराज कंपनीच्या शार्पनरचा बॉक्स होता. सदर बॉक्स उघडल्यानंतर त्याच्या आतमध्ये दोन पांढऱ्या कपडयांच्यामध्ये एका कागदात सेलोटेपने चिकटवलेली रिव्हॉल्वर/पिस्तूलची गोळी दिसली. त्यानंतर सदरचा बॉक्समध्ये आणखी एक कागद भेटला त्यावरती "Iss Baar Hath M De Raha Hu Agli Baar Sala Khopdi M Daal Dunga Ye To Ek Chota Sa Gift Hai Agli Baar Isse Bda Gift Dunga Tere Ko Bahot Charbi Hai Kya Vikas Respale " अशी धमकी लिहलेली चिठ्ठी होती.



राजकीय वातावरण तापलं : सदर प्रकारानंतर विकास रेपाळे यांनी त्वरित वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर वागळे इस्टेट पोलीस मात्र डी.टी.डी.सी कंपनीचे कुरिअर घेऊन आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलीस आसपासच्या सीसीटीव्ही तपासून कुरियर बॉयची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अशा प्रकारे आलेल्या धमकीनं राजकीय वातावरण तापलं आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईत 8 पिस्तूलांसह 15 जिवंत काडतुसे जप्त, अटकेतील दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू
  2. मुंबई एटीएसची मोठी कारवाई, 3 बंदुका अन् 36 जिवंत काडतुसे जप्त; 6 अटकेत
  3. मध्यप्रदेशातून पिंपरीत आणलेली 7 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त; पुणे परिसरात कोयत्यानंतर पिस्तूलचा होतोय प्रसार

ABOUT THE AUTHOR

...view details