सोलापूर Vidya Lolage Reaction on Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंच्या (Sambhaji Bhide) वक्तव्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. सोलापुरातील 'वाव विधवा संघटने'च्या अध्यक्षा विद्या लोलगे (Vidya Lolage) यांनी भिडेंच्या विधानाला सडेतोड उत्तर दिलंय. "संभाजी भिडे यांनी महिलांबाबत वादग्रस्त बोलू नये, अन्यथा राज्यातील महिला एकत्र येत संभाजी भिडेच्या मिशा कापतील", असा इशारा विद्या लोलगे यांनी दिलाय. संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेबाबत विधान केलं होतं.
प्रतिक्रिया देताना विद्या लोलगे (ETV Bharat Reporter) वटपौर्णिमेबाबत वादग्रस्त विधान : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी माऊली तुकोबांचा जयघोष करत पंढरीच्या वाटेला निघाले आहेत. पुण्यातील अशा उत्साही वातावरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेही त्यांच्यासोबत जाणार आहेत. भिडे यांनी पुण्यात आल्यावर जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. धारकऱ्यांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनी जावं असं ते म्हणाले.
विधवांना स्वयंसिद्धा म्हणावे: वाव सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना विधवा महिलांच्या समस्या मांडल्या. घरातील कर्ता पुरुषांचे अकाली निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. अशा संकटग्रस्त महिलांना आधार देवून त्यांना संघटित करून त्यांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी संघटना स्थापन करण्यात आल्याची माहिती, "वर्ल्ड ऑफ वुमेन्स (wow)" च्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिली. वाव संघटनेच्या माध्यमातून एक लाख महिला संघटित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांना "स्वयंसिध्दा" बनविण्यात येणार आहे. यापुढील काळात विधवा, घटस्फोटित महिलांना "स्वयंसिध्दा" या नावाने ओळखण्यात यावं, शासनानं तसं परिपत्रक काढावं अशी मागणी, विधवा महिलांनी केलीय.
हेही वाचा -
- Tushar Gandhi Complaint : भिडेंवर कारवाईची अपेक्षा करणं चुकीचं कारण, पंतप्रधानांपासून फडणवीसांपर्यंत....; तुषार गांधींची टीका
- आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री: संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य - Bhide Controversial Statement
- मनमाडमध्ये संभाजी भिडेंचा ताफा अडवला, दाखवले काळे झेंडे