महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील 5 महिला भाविकांना उत्तराखंडमध्ये चिरडणाऱ्या टँकर चालकाला अटक - Srinagar Tanker Driver Arrest - SRINAGAR TANKER DRIVER ARREST

Srinagar Tanker Driver Arrest : उत्तराखंडच्या श्रीनगर गढवालमध्ये महाराष्ट्रातील पाच महिला भाविकांना चिरडणाऱ्या टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Srinagar Tanker Driver Arrest
Srinagar Tanker Driver Arrest (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 4:10 PM IST

श्रीनगर Srinagar Tanker Driver Arrest :श्रीनगरच्या श्रीकोटमध्ये पाच महिला भाविकांना चिरडणाऱ्या टँकर चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत टँकर चालकानं भरधाव वेगात गाडी चालवत आधी गायीच्या वासराला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला बसलेल्या पाच महिलांना चिरडलं.

महिला हॉटेलबाहेर बसल्या होत्या :13 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 च्या सुमारास बद्रीनाथ महामार्गावरील रामा हॉटेल श्रीकोट येथे महाराष्ट्रातील महिला भाविक हॉटेलबाहेर बसल्या होत्या. तेव्हा अनियंत्रित टँकर क्रमांक UK 12 CA 0032 ने त्यांना चिरडलं. पाचही महिला महाराष्ट्रातील रहिवासी होत्या. त्या आपल्या कुटुंबियांसोबत उत्तराखंडच्या चार धामला भेट देण्यासाठी आल्या होत्या. परतत असताना हा भीषण अपघात झाला.

  • सरिता ​​गौरी (वय 50 वर्षे) रा. अकोला आणि ललिता तौरी (वय 50 वर्षे) रा. अकोला यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर सारिका राजेश राठी (वय 46 वर्षे) रा. अमरावती), संतोषी धनराज राठी (वय 45 वर्षे) आणि मधुबाला राजेंद्र कुमार (वय 54 वर्षे) रा. अकोला या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

टँकर चालकाला अटक : भीषण अपघातानंतर टँकर चालक फरार झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम 54/2024 कलम 281/125(अ) (ब)/106 बीएनएस आणि 11 प्राण्यांवर क्रूरता कायदा 1960 अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपी टँकर चालक सुभाष दरवे याला अटक केली आहे. आरोपी चालक झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील दुधनी गावचा रहिवासी आहे. आरोपी हा श्रीनगर, श्रीकोट येथे राहत होता. आरोपीला न्यायालयात हजर करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक होशियार सिंग पंखोली यांनी दिली.

हेही वाचा

  1. मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाकडून महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईच्या 'या' रुग्णालयातील घटना - Female Doctor Assaulted By Patient
  2. कानपूरजवळ साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरली; दगडावर आदळून झाला अपघात, घातपाताची शक्यता - Sabarmati Express Derail
  3. अटल सेतूवरुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस आणि कॅब ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळं वाचले प्राण, पाहा सीसीटीव्ही - Woman Suicide Attempt Atal Setu

ABOUT THE AUTHOR

...view details