महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाना शंकरशेठ यांच्या तैलचित्राचं अनावरण; जाणून घ्या विकासकार्य - NANA SHANKAR SHETH

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या तैलचित्राचं आज मुंबईत अनावरण करण्यात आलं.

Nana Shankar Sheth
नाना शंकरशेठ यांचं तैलचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2025, 6:27 PM IST

मुंबई :ब्रिटिशांची सत्ता भारतावर असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात मोलाचं योगदान दिलेल्या जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या तैलचित्राचं आज मुंबईत समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. नानांच्या दोनशे बाविसाव्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आयोजित केला होता.

यांची होती उपस्थिती : या सोहळ्याला नानांचे सध्याचे वंशज आणि जगन्नाथ शंकर शेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकर शेठ त्याचबरोबर सरचिटणीस मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर तसेच उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, कुलसचिव शशिकांत काकडे, राज्याचे कला संचालक संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.

काय आहे सोहळ्याचं विशेष? :सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसाठी नाना शंकरशेट यांनी जमीन उपलब्ध करून दिली होती. म्हणून या संस्थेत संस्थेत नाना शंकरशेठ यांचं व्यक्तिचित्र असावं अशी नाना शंकरशेठ प्रतिष्ठानची इच्छा होती. या सोहळ्याचं विशेष असं की, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत व्यक्तिचित्रण हा विषय शिकवणारे अध्यापक प्रकाश सोनवणे यांनीच नानांचं हे पूर्णाकृती व्यक्तिचित्र तैलरंगात घडवलं असून ते आता संस्थेच्या मुख्य दालनात जमशेदजी जीजीभाॅय यांच्या प्रतिमेसोबतच दिसणार आहे.

नाना शंकरशेठ यांचं विकास कार्य : मुंबईतील लोकल ट्रेन मुंबईकरांच्या प्रवासाचं मुख्य साधन बनली आहे. या लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी देखील म्हणतात. रोज अनेक प्रवासी या लोकलने प्रवास करतात. मुंबईत जागतिक दर्जाची शाळा, कॉलेजेस आहेत. या सर्व सेवा, सुविधा मुंबईकरांना देण्याचा विचार ज्या माणसाच्या मनात आला ती व्यक्ती म्हणजे नाना शंकरशेठ. आशिया खंडातली सर्वांत पहिली रेल्वे बोरीबंदर म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणेपर्यंत धावली. ही आशिया खंडातली पहिली ट्रेन सुरू करण्याचं श्रेय जातं ते नाना शंकरशेठ यांनाच.

हेही वाचा -

  1. मुंबई सेंट्रलचे नामकरण लवकरच होणार नाना शंकर शेठ स्टेशन
  2. मुंबई सेंट्रल स्थानकाला समाजसेवक नाना शंकरशेठ यांचे नाव; मंत्रिमंडळाची मंजुरी
  3. मुंबईला पहिली रेल्वे आणि इंग्रजी शिक्षणसंस्था देणाऱ्या नाना शंकरशेठ यांची आज पुण्यतिथी; त्यांच्या कार्याचा आढावा - Nana Shankarsheth Death Anniversary

ABOUT THE AUTHOR

...view details