सातारा Ramdas Athawale Car Accident : साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरनं धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. तसंच दुसऱ्या वाहनानं ते मुंबईकडं रवाना झाले आहेत.
आठवलेंच्या गाडीचं मोठं नुकसान : घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या वाहनानं साताऱ्याहून मुंबईकडं जात होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंज (ता. वाई) गावच्या हद्दीतील बोगद्यात त्यांच्या मोटारीला एका कंटेनरनं जोऱ्यात धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाले. रामदास आठवले हे मात्र सुखरूप आहेत.