मुंबई Uddhav Thackeray in Vidhan Parishad : आपल्या भाषणातून सभांमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेत मौन बाळगून आहेत. विधान परिषदेचे आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात एकही प्रश्न उपस्थित केला नसल्याची माहिती विधान भवनातील शासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
विधान परिषदेत ठाकरे शांत : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सत्ताधारी पक्षांवर सातत्यानं टीका करतात. मात्र, ते विधान परिषदेत गेल्या दोन वर्षापासू गप्प आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकात प्रचार सभांमधून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्य : सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासोबतच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली होते. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात राज्यपालांना आपला लेखी राजीनामा सुपूर्द केला नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा देणार नसल्याचं जाहीर केलं. ते विधान परिषद सदस्य म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून विधान परिषदेत विरोधी पक्षात काम करत आहेत. वास्तविक विरोधी पक्षातील विधान परिषदेतील अथवा विधानसभेतील आमदार सातत्यानं जनतेचे प्रश्न सभागृहात मांडत असतात. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडून उत्तरं यावीत यासाठी प्रयत्न करत असतात.
उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेत मौन : उद्धव ठाकरे हे गेल्या दोन वर्षांपासून विधान परिषदेत विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत आहेत. मात्र, ते क्वचितच सभागृहात दाखल होतात. विरोधी पक्षात आल्यापासून नुकत्याचं झालेल्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जनतेच्या हिताचा एकही प्रश्न विचारला नसल्याचं विधिमंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच सभागृहातील कामकाजामध्येही फार कमी वेळा त्यांनी सहभाग घेतला.
जनतेच्या हिताशी देणं- घेणं नाही : या संदर्भात बोलताना विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना केवळ सत्ता महत्त्वाची वाटते. सत्तेसाठी, पैशासाठी वाटेल ते करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळं विधान परिषदेचे आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडावेत, असं त्यांना वाटणं शक्य नाही."
विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न :या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "जे लोक खुलेआम विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत, ते सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार? केंद्र, राज्य सरकार फक्त विरोधी पक्षांना दाबण्याचं काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सर्व काही स्पष्ट केलं."
'हे' वाचलंत का :
- सरकारची आता 'लाडका मित्र लाडका कॉन्टॅक्टर योजना'; उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Uddhav Thackeray on Dharavi
- दादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा; अजित पवार म्हणाले "मी माझ्या पैश्याचं घालतो..." - Ajit Pawar Pune Visit
- दादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा; अजित पवार म्हणाले "मी माझ्या पैश्याचं घालतो..." - Ajit Pawar Pune Visit