महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव अन् रश्मी ठाकरे घटनातज्ञ उल्हास बापट आणि आसिम सरोदेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय? - Uddhav Thackeray Meet Ulhas Bapat - UDDHAV THACKERAY MEET ULHAS BAPAT

Uddhav Thackeray Meet Ulhas Bapat : पुणे दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची भेट घेतली. या भेटीत काही घटनात्मक बाबींवर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray Meet Ulhas Bapat
उद्धव ठाकरे घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या भेटीला (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 11:04 PM IST

पुणे Uddhav Thackeray Meet Ulhas Bapat And Asim Sarode : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज घटनातज्ञ उल्हास बापट आणि घटना अभ्यासक असीम सरोदे यांची भेट घेतली. यावेळी उल्हास बापट यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी जवळपास एक तास चर्चा केली. तर आसिम सरोदे यांच्या ऑफि वर देखील जवळपास आर्धा चर्चा झाली आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या भेटीला (Source - ETV Bharat Reporter)

भेटीचं कारण काय? : शिवसेना फुटीनंतर न्यायालयीन लढाई लढताना घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपली भूमिका मांडत कायद्याच्याबाबत अनेक खुलासे केले होते. तर असीम सरोदे हे आमदार अपात्र सुनावणीवेळी वकीलदेखील होते. न्यायालयीन सुनावणी सुरू झाली असल्याने काही घटनात्मक बाबींवर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे ही कौटुंबिक भेट होती, असं देखील सांगितलं जात आहे.

पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निकाल महत्तवाचा : आजच्या बैठकीबाबत असिम सरोदे म्हणाले की, "आमदार अपात्रतेच्या बाबतीत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये किती लवकर निकाल लागू शकतो. याबाबत उद्धव ठाकरेंनी अनेकदा उल्लेख केला आहे. आमदार अपात्रेच्या संदर्भात जर निकाल लागत नसेल तर ते अत्यंत दुःखद आहे. तसेच पक्ष चिन्ह आणि नाव याबाबत निवडणूक आयोगानं जो निकाल दिला आहे, तो अत्यंत वाईट स्वरूपाचा आहे, असं उद्धव ठाकरेंच मत आहे. आमदार अपात्रतेच्या निकालापेक्षा पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निकाल हा लवकर लागला पाहिजे. संविधानिक तसेच घटनात्मक दूष्टीकोनातुन हा निकाल लागणं महत्त्वाचं आहे. असं उद्धव ठाकरे यांना वाटत आहे." असं असिम सरोदे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, "भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केलीय. याचा अर्थ त्यांना आमदार अपात्रतेच्याबाबत उशीर करायचा आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल चुकीचा आहे, असं जर शिंदे गटाला यांना वाटत असेल आणि तर त्यांनी कोर्टात दाखवणं हादेखील नाटकीपणा आहे. तसेच जे नवीन मतदार आहे त्यांचा महाराष्ट्राच्या बाबतीतला दृष्टीकोन बदललेला आहे. आता ते भाजपकडे न राहता वास्तविकतेकडे वळलेले आहेत, असं निरीक्षण उद्धव ठाकरे यांनी नोंदविले आहे."

हेही वाचा

  1. "देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवायचं स्वप्न..."- मनोज जरांगे - MANOJ JARANGE PATIL NEWS
  2. का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
  3. "थोरात यांची इच्छा असेल तर...", विधानसभा निवडणुकीवरुन सुजय विखे पाटील, बाळासाहेब थोरात आमने-सामने - Sujay Vikhe Vs Balasabeb Thorat
  4. उद्धव ठाकरेंना पुन्हा बसणार धक्का ; निवडणूक आयोग पुढील आठवड्यात 'या' प्रकरणी कारवाई करण्याची शक्यता - Uddhav Thackeray In Trouble

ABOUT THE AUTHOR

...view details