नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या मोहगाव झिलपी तलावात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर शहरातील दिघोरी आणि खरबी परिसरातील 13 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलं झिलपी तलावाच्या परिसरात फिरायला आले होते. हे सर्व वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी असून एकाच परिसरात राहत असल्यानं त्यांची ओळख होती. विरसेन विठोबा गजभिये व गौरव लीलाधर बुरडे (वय 15 वर्षे) या दोघांचा बुडून मृत्यू झालाय.
मित्रांनी रोखण्याचा प्रयत्न केला :चौदा ते पंधरा वर्षे वयोगटातील मित्र मोहंगाव झिलपी तलावाकडे फिरायला गेले होते. विरसेन व गौरवची पोहण्याची इच्छा झाल्यानं तलावात उतरले. इतर 5 जणांनी तलावात जाण्यापासू त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. त्यामुळं इतर सर्व तलावाच्या काठावर असलेल्या एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते. पाण्यात काही दूर गेल्यावर हे दोघेही दिसेनासे झाले. काही वेळानंतर ते दिसेनासे झाले त्यामुळं मित्रांनी आरडाओरडा सुरू केला असता त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचं निष्पनं झालं.