कोल्हापूरBe careful electrical accidents :कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात असणाऱ्या कोपर्डे गावात दोन भावांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या विद्युत अपघातानं कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र गेल्या दीड वर्षात महिन्यात सरासरी तीन व्यक्तींना विजेच्या धक्यानं प्राणाला मुकावं लागलं आहे. या अपघाताचे प्रमुख कारण निष्काळजीपणा असून जीवितहानी टाळण्यासाठी काळीज घेणे गरजेचे आहे.
महिन्याला सरासरी तिघांचा बळी : कृषीपंप, घरगुती विद्युत जोडणी करताना अपघात होण्याचं प्रमाण मोठं आहे. पावसाळा या अपघातात वाढ होताना दिसते. त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील वीजेबाबत काळजीपूर्वक काम करायला हवं, असं सहाय्यक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे यांनी म्हटलं आहे. कृषी पंप, तुटलेल्या वीजेच्या वायरचा स्पर्श स्पर्श होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील कोपर्डे गावच्या दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवतेय. जानेवारी 2023 ते मे 2024 या दीड वर्षाच्या कालखंडात कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत अपघातात 54 जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. महिन्याला सरासरी तीघांचा वीजेमुळं जीव जातोय. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्यानं हे अपघात घडत आहे, अशी आकडेवारी सांगते. मात्र, वीजेचं काम करताना काळजी घेतल्यास जीवघेणे अपघात टळू शकतात. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षितता बाळगावी. ओल्या हातानं कृषी पंप हाताळू नयेत, असं आवाहन सहाय्यक विद्युत निरीक्षक प्रभाकर पतंगे यांनी केलं आहे.