महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंडिगो विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती - इंडिगो विमान

Indigo flight Bomb threatened : चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-5188 ला हवेत बॉम्बच्या धमकीचं पत्र मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विमानात काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

Indigo flight Bomb threatened
Indigo flight Bomb threatened

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 10:39 PM IST

मुंबईIndigo flight Bomb threatened : चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमान क्रमांक 6E-5188 मध्ये एक धमकीचं पत्र सापडल्यानंत विमानत एकच खळबळ उडाली. पत्र मिळाल्यानंतर विमान तात्काळ मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं असून सर्वत्र शोधामोहिम राबवण्यात आली आहे.

तुम्ही मुंबईत आलात तर सगळे मरतील :याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंडिगो कंपनीचं 6E-5188 विमान मंगळवारी सकाळी चेन्नईहून मुंबईसाठी उड्डाण केलं होतं. विमान मुंबईपासून 40 किमी अंतरावर असताना कर्मचाऱ्याला विमानाच्या शौचालयात एक चिठ्ठी सापडली. ‘तुम्ही मुंबईत आलात तर सगळे मरतील’, असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. त्यामुळं प्रवाशांमध्ये एकच धांदल उडली. या धमकीची बाब केबिनक्रूच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं पायलटला याची माहिती दिली. तसंच विमानाच्या कॅप्टननं तातडीनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली.

  • अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल :इंडिगो विमान मुंबईत उतरताच संपूर्ण विमान तसंच प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विमानात काहीही संशयास्पद आढळलं नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इंडिगो फ्लाइटला बॉम्बनं उडवण्याची धमकी : इंडिगोनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E5188 ला बॉम्बची धमकी मिळाली. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचं पालन करण्यात आलं आहे. विमानतळ सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमान विमानतळावरून बाहेर काढण्यात आलं. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनलच्या आवारात परत आणलं गेलं.

यापूर्वीही धमक्या :यापूर्वी आरबीआयसह देशातील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात 7 विमानतळांचा समावेश होता. या धमकीनं जयपूर विमानतळ प्रशासन चक्रावलं होतं. ई-मेलमध्ये दिल्ली, जयपूर, लखनौ, चंदीगड, मुंबई, चेन्नई अहमदाबाद विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता सर्व माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झालं होतं.

हे वाचलंत का :

ABOUT THE AUTHOR

...view details