मुंबई - Loksabha Election 2024 : भाजपाचे खासदार उन्मेश पाटलांचा हे आज (बुधवारी) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पार्टीनं लोकसभेचं तिकिट नाकारल्यानंतर पाटील यांचा शिवसेना पक्षप्रवेश होत आहे. उन्मेश पाटील यांना तिकिट देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र जळगावत शिवसेनेची ताकद एकत्र दिसेल. जळगावात शिवसेनेचा पहिला खासदार दिसेल, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. तसेच यावेळी संजय राऊतांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींची आश्वासनं आणि नारेबाजीवरुन जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, देशात सगळीकडे भाजपा नारे देत आहे... नारेबाजी करत आहे. मात्र, भाजप नारे देण्याच्या लायकीचं नाही. मोदी हे देशभर नारे देताहेत... अखंड हिंदुस्थान करु... पाकव्याप्त काश्मीरला हिंदुस्थानात आणू, चीनला धडा शिकवू अशी आश्वासनं देताहेत, मात्र त्या आश्वासनाचं आणि नाऱ्यांचं काय झालं? किती आश्वासनं मोदींनी पूर्ण केली, हे देश बघत आहे. मोदींवर नाऱ्यांचे पुस्तक काढले पाहिजे, असा टोला खासदार संजय राऊतांनी मोदींना लगावला. गर्जना आणि नारे यात फरत आहे. शिवसेनेच्या आमच्या डरकाळ्या आहेत. भाजपावाल्यांचे नारे आहेत. मात्र, आता त्यांच्या नाऱ्यांना कोण महत्त्व देणार नाहीय, असं राऊत म्हणाले.
ईडी, सीबीआय ही भाजपाची मूळं...
ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणा ही भाजपाची मूळं आहेत. आता ही मूळं जमिनीतून उपटून पडणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा हा महावृक्षच आता उन्मळून पडल्याचं निवडणुकीत तुम्हाला दिसेल, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर फक्त विरोधकांवर केला जात आहे. त्यामुळे भाजपाची मूळंही लवकरच उपटून पडतील, असं राऊत म्हणाले. दरम्यान, साताऱ्याची जागा काँग्रेसला जाणार आहे आणि तिथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे असा प्रश्न राऊतना विचारला असता, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडे आहे. मात्र यावर काही चर्चा झाली असेल तर मला माहित नाही, असं राऊत म्हणाले.
मोदी भ्रष्टाचारांना वाचवताहेत...
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'मोदी खाऊंगा ना खाने दूंगा', असं म्हणतात. 'मै भ्रष्टाचारी लोगोंको को छोडूंगा नही', असं रॅलीत म्हणताहेत. पण नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना वाचवत आहेत, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. इंडिया आघाडीचे उलटे आहे, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत आणि मोदी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. आता दिल्लीतील संजय सिंग यांना न्यायालयाने जामीन मंजूर करत, सरकारवरच ताशेरे ओढले आहेत. संजय सिंग यांची अटक ही बेकायदेशीर होती. ईडीचा वापर करून विरोधकांवर कारवाई केली जात आहे, असं न्यायालयानं म्हणत सरकारवर ताशेरे ओढलेत, अशी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली.
आम्हाला हाच सामना पाहिजे...