Activity Increase Life Expectancy: तुम्ही नियमित अडीच तास चालता का? जे लोक दररोज अडीच तासांपेक्षा जास्त चालतात त्यांना जुनाट आजार होण्याचा धोका कमी होतो. तसंच त्यांचं आयुर्मान आणखी 11 वर्षांनी वाढू शकते, असं ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिनने केलेल्या एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स, 2003-2006 नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशनल एक्झामिनेशन सर्व्हे, यूएसए 2019 च्या जनगणनेचा डेटा वापरून हा अभ्यास करण्यात आला.
काय आहे संशोधन? 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 25 टक्के अमेरिकन लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. यात असं आढळून आलं की, जे लोक शारीरिकरित्या जास्त सक्रिय असतात ते सुमारे पाच वर्षे जास्त जगू शकतात. यामुळे या अभ्यासानुसार असा अंदाज लावण्यात आला की, जे लोक नियमित अडीच किलोमिटर पेक्षा जास्त चालतात त्यांचं आयुर्मान इतरांच्या तुलनेत 11 वर्षे वाढते. संशोधकांचं म्हणणं आहे की, जे लोक कमी शारीरिक हालचाली करतात त्यांना हृदविकार आणि अकाली मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
लोकांच अनुभव: या अभ्यासात 40 पेक्षा जास्त वयाच्या सक्रिय 25 टक्के लोकांनी सांगितलं की, ते नियमिती 4.8 किलोमीटर प्रति तास किंवा 160 मिनिटे वेगानं चालतात. यावरून संशोधकांनी अंदाज लावला की, त्यांचे आयुर्मान 78.6 वर्षांवरून 84 वर्षांपर्यंत वाढेल. तसंच कमी चालणाऱ्या व्यक्तीना सुमारे 111 मिनिट जास्त चालावं लागेल, असं केल्यास ते जास्त काळ जगू शकतील, तसंच प्रत्येक व्यक्तीनं अतिरिक्त काही तास चालल्यास त्याचे आयुष्य जवळजवळ 6 तासांनी वाढते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)