ETV Bharat / state

सत्ता स्थापनेसाठी अपक्ष किंगमेकर ठरणार? एकूण अपक्ष उमेदवारांची संख्या किती? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी राज्यात महत्त्वाचे पक्ष असले तरी अपक्षांची संख्यादेखील लक्षवेधी आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

maharashtra assembly election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (ETV Bharat FIle Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2024, 5:00 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरलेत, तर प्रचारासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आपलेच सरकार सत्तेत येणार, असा दावा करण्यात येतोय. मात्र राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं तज्ज्ञ आणि जाणकारांना वाटतंय. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी राज्यात महत्त्वाचे पक्ष असले तरी अपक्षांची संख्यादेखील लक्षवेधी आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे किंवा अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. कारण राज्यात एकूण चार हजारांपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक अपक्ष उमेदवारांच्या अर्ज दाखल केलेत. त्यामुळं सत्ता स्थापन करण्यासाठी 1995 मध्ये अपक्ष उमेदवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तशीच यावेळीसुद्धा अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

एकूण पक्ष किती? अपक्ष किती? : विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळं किंवा उमेदवारी न मिळाल्यामुळं अनेक नाराजांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतलाय. तर अनेकांनी बंडाचे अस्त्र उगारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच मोठं बंड झालंय. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीला स्वकियांचाच सामना करावा लागणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होऊन अगदी थोड्याफार फरकाने उमेदवार पराभूत होऊ शकतात किंवा विजयी होऊ शकतात, असं बोललं जातंय. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र पाहिल्यास एकूण 4136 उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यापैकी 158 पक्षाचे एवढे 2050 उमेदवार आहेत. तर 2086 अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत. यंदा पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्षाचे उमेदवार मत लुटण्यासाठी उभे करण्यात आल्याचंही बोललं जातंय. दुसरीकडे राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरांना स्वतःकडे वळवण्यासाठी किंवा त्यांना स्वतःकडे घेण्यासाठी चुरस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

1995 ला काय झालं होतं? : राज्यात 1995 साली पहिल्यांदाच बिगर काँग्रेसचे म्हणजे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले होते. यावेळी अपक्ष 45 आमदार निवडून आले होते. 3 हजारांहून अधिक अपक्ष उमेदवारांनी 1995 साली निवडणूक लढवली होता. विशेष म्हणजे 91 लाखांहून अधिक मतेही अपक्षांनी मिळवली होती. परिणामी अपक्षांच्या जीवावर त्यावेळी सरकार तरले होते. शिवसेना भाजपाचे मिळून 138 आमदार होते. सत्ता स्थापनेसाठी सात आमदार कमी पडत होते, तेव्हा तर काँग्रेसचे 80 आमदार निवडून आले होते. मात्र त्यांच्याकडे सरकार स्थापन व्हावे, एवढे आमदार नसल्यामुळं पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली. दुसरीकडे अपक्षांची मनधरणी करण्यासाठी आणि सरकारमध्ये घेण्यासाठी तेव्हा सत्ताधारी शिवसेना-भाजपाला मोठी कसरत करावी लागली होती. अनिल देशमुखांसारखे अपक्षदेखील तत्कालीन युतीच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले होते. 45 अपक्षातील आमदारांनी काही शिवसेनेत तर काहींनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा अपक्षांची भूमिका सत्ता स्थापना खूप मोलाची आणि महत्त्वाची ठरली होती. यावेळी देखील अशीच परिस्थिती होणार का? किंवा महायुती महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर अपक्षांचा भाव वाढणार असून, त्यांना सत्तेत सामील करून घेण्यासाठी सत्ताधारी नेत्यांकडून मोठं आमिष दाखवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तशी परिस्थिती येणार नाही : अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केलेत. मतांचे विभाजन होणार असल्यामुळं अपक्षांचा भाव वधारणार आहे का? किंवा अपक्ष हे सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरणार का? असा प्रश्न राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांना विचारला असता, "मला असं वाटत नाही. कारण सध्या मुख्य प्रवाहात सहा पक्ष आहेत. त्यानंतर उपप्रवाहामध्ये 5 पक्ष आहेत. यांच्यातच मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होईल आणि यानंतर अपक्षांचा मतांसाठी नंबर लागेल. त्यामुळं 1995 रोजी 45 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यावेळी असं चित्र दिसण्याची शक्यता खूप कमी आहे. अपक्ष जिंकून येतील, असं मला वाटत नाही. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी त्यांची महत्त्वाची भूमिका ठरणार नाही किंवा ते सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर होतील, असं मला वाटत नसल्याचं जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे. 1995 विधानसभा निवडणुकीत 45 अपक्ष आमदार निवडून आले होते. यामध्ये अनेक चेहरे हे चर्चेतील होते.

1995 ला चर्चेतील अपक्ष चेहरे कोण?

- अनिल देशमुख (काटोल)
- रामराजे नाईक निंबाळकर (फलटण)
- शिवाजी कर्डिले (अहमदनगर उत्तर)
- राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा)
- दिलीप सोपल (बार्शी)
- संपतराव देशमुख (भिलवडी वांगी)
- राजवर्धन कदमबांडे (धुळे)
- बदामराव पंडित (गेवराई)
- के. सी. पाडवी (अक्रानी)
- हर्षवर्धन पाटील (इंदापूर)
- रमेश बंग (कळमेश्वर)
- अजितराव घोरपडे (कवठेमहांकाळ)
- विजयकुमार गावित (नंदूरबार)
- बबनराव शिंदे (माढा)
- मदनराव पिसाळ (वाई)
- सीताराम घनदाट (गंगाखेड)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.