ETV Bharat / politics

शरद पवारांनी भर पावसात घेतली सभा; म्हणाले, "माझा अन् पावसाचा..."

इचलकरंजीमध्ये शरद पवार हे मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसानं हजेरी लावली. शरद पवारांनी पंधरा मिनिटं मुसळधार पावसात भाषण केलं.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
शरद पवारांनी पावसात केलं भाषण (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 1 hours ago

कोल्हापूर : लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती. यावेळी या सभेनंतर सातारा लोकसभेचा नूरच पालटला आणि श्रीनिवास पाटील यांनी विजय संपादन केला होता. याच सभेची पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली. कोल्हापुरातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी शरद पवारांनी आज (15 नोव्हेंबर) भर पावसात सभा घेतली. ही सभा गेम चेंजर ठरणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सभांचा धडाका : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 3 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांची सभा संपल्यानंतर शरद पवारांनी सहकार पंढरी कोल्हापुरात तीन सभांचं नियोजन केलं होतं. यातील पहिली सभा इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित करण्यात आली होती.

शरद पवारांनी पावसात केलं भाषण (Source - ETV Bharat Reporter)

शरद पवारांची मुसळधार पावसात सभा : शरद पवारांचं दोन वाजून पंधरा मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झालं, याआधी इचलकरंजी शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, सकाळपासून शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी थांबलेल्या मतदारांनी शरद पवार व्यासपीठावर आल्यावर एकच जल्लोष केला. यानंतर शरद पवार भाषणाला उभे राहिले, यावेळी इचलकरंजीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, पवारांनी भाषण न थांबवता आलेल्या लोकांना संबोधित केलं.

सभा गेम चेंजर ठरणार? : शरद पवारांच्या या सभेला आलेल्या नागरिकांनी मुसळधार पावसामुळं खुर्च्या डोक्यावर घेऊन पवारांचं भाषण ऐकलं. महायुतीला पराभूत करून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, घराणेशाहीला नेस्तनाबूत करा, असं आवाहन करत शरद पवारांनी सुमारे पंधरा मिनिटं मुसळधार पावसात भाषण केलं. आता पवारांचं हे भर पावसातील भाषण आणि सभा इचलकरंजीत गेम चेंजर ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भर पावसात उमेदवार व्यासपीठावर : शरद पवारांचं भाषण सुरू असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावरील इचलकरंजी विधानसभेचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासह शिरोळचे उमेदवार गणपतराव पाटील यांनीही भर पावसात शरद पवार यांच्या सोबत उभारून भाषण ऐकलं. भाषणाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. "पाऊस आणि माझा तसा काही संबंध नाही. मात्र, भाषणाच्या वेळी पाऊस लागल्यामुळं निकाल चांगला लागेल," असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा

  1. पत्नीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात देवेंद्र फडणवीस संतप्त, म्हणाले, "काँग्रेसच्या ट्रोल आर्मीकडून..."
  2. आली रे आली आता तुमची बारी आली; मनसे आमदार राजू पाटील यांचा शिंदे पिता पुत्रांविरोधात 'एल्गार'
  3. 'याच दाढीमुळे यांची गाडी खड्ड्यात गेली'; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.