ETV Bharat / politics

"हवाओंका रूख बदल चुका है", देवेंद्र फडणवीसांचा पृथ्वीराज चव्हाणांना सूचक इशारा

महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पीचवर जोरदार बॅटींग केली.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

सातारा : कराड दक्षिणचा फैसला झालाय. 'हवाओंका रूख बदल चुका है', असं सांगत कराड दक्षिणमध्ये महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पृथ्वीराजबाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही. ते इंटरनॅशनल मटेरियल असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

आमच्या पेनाला लकवा मारत नाही : "महायुतीचे उमेदवार अतुल भोसले कोणत्याही पदावर नाहीत. तरी देखील रस्त्यांसाठी 473 कोटी, 77 कोटींच्या पाण्याच्या योजना, छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं. आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही. अतुलबाबांसाठी आमचा पेन नॉनस्टॉप आहे. परंतु, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी फुटकी कवडी देखील दिली नसल्याचा" आरोप यावेळी फडणवीसांनी केला.

जो काम करतो, त्याला जनता श्रेय देते : "पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या विस्तारीकरण आणि हायवेवरील पुलांसाठी केंद्र सरकारनं एकत्रित निधी दिलाय. परंतु, हायवेरचा चार पदरी पूल आम्ही मंजूर केल्याचं पृथ्वीराज चव्हाण सांगतात. काहीही झालं तरी माझ्यामुळंच झाल्याचं सांगून श्रेय घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याची" टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. "जो काम करतो, त्याला जनता श्रेय देत असते. मागायची गरज नसते," असंही फडणवीस म्हणाले.

सावत्र भाऊ मार्केटमध्ये फिरताहेत : "महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारनं 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली. परंतु, काँग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ही योजना फसवी आहे, पैसे मिळणारच नाहीत, हा राजकीय जुमला असल्याची टीका केली. तसंच कोर्टात धाव घेतली. तेच सावत्र भाऊ आज मतं मागण्यासाठी मार्केटमध्ये फिरत आहेत," असा टोला फडणवीसांनी लगावला.

हेही वाचा

  1. आम्ही काय चूक केलीय, पूर्वीचे रेकॉर्ड काढा, मग काय घडलं ते समजेल; अजित पवारांचा थेट शरद पवारांना इशारा
  2. साताऱ्याच्या सभेची इचलकरंजी पुनरावृत्ती, शरद पवारांनी भर पावसात घेतली सभा
  3. हिंगोलीत गृहमंत्री अमित शाहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; व्हिडिओ शेयर करत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.