महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तेजस ठाकरेंच्या 'या' संशोधनाची फोर्ब्जने घेतली दखल - Tejas Thackeray Research

Tejas Thackeray Research : उद्धव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. याची दखल फोर्ब्ज मॅगजिनने घेतली आहे. ही प्रजाती तामिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली. जाणून घ्या सविस्तर बातमी

Tejas Thackeray Research
तेजस ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 10:34 PM IST

मुंबई Tejas Thackeray Research : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे. उमेदवाराला कसे निवडून आणायचे याचा प्रचार राजकीय पक्षाकडून जोरदार सुरू आहे. ठाकरे गटाकडूनही सत्ताधाऱ्यांवरती आरोप करण्यात येत आहेत; मात्र ठाकरे कुटुंबातून राजकारणा व्यतिरिक्त एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत; मात्र उद्धव ठाकरे यांचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तेजस ठाकरे यांची फोर्ब्सकडून दखल घेण्यात आली आहे. तेजस ठाकरे यांच्या विशेष संशोधनाबद्दल ही दखल घेण्यात आली आहे.

गोल बुबळे असलेल्या पालींचा शोध :मार्च महिन्यात आदित्य ठाकरे आणि त्यांचे दोन सहकारी यांनी तामिळनाडूच्या जंगलात भगोल बुबळे असलेल्या दोन पालीच्या प्रजातींचा शोध लावला आहे. या दोन पाली वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या आहेत. तामिळनाडूतील पश्चिम घाटात पूर्व उतारातील जंगलामध्ये तेजस ठाकरे यांनी गोल-बुळुळ्याच्या दोन पालींच्या प्रजातीचा शोध लावला आहे. याची दखल फोर्ब्स मासिकाने घेतली आहे.

दोन्ही पाली निमास्पिस कुळातील :ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून विविध जाती आणि प्रजातीचे संशोधन करण्यात येते. दरम्यान, या दोन पालीच्या संशोधनामध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल यांचा समावेश आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य असल्याची माहिती समोर येत आहे. या संशोधन केलेल्या पालींच्या शरीराची रचना, आकार, रंग, मांडीवरील ग्रंथींची संख्या आणि पाठीवरील ट्युबरकलची रचना तसेच आधी वैशिष्ट्यावरून या दोन्ही पाली निमास्पिस कुळातील आहेत. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून या पालींचे प्रथमच संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे फोर्ब्स या मासिकाने याची दखल घेतली आहे.


शोध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ :ही प्रजाती तामिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली. यातील निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीची विशेष दखल फोर्ब्जने घेतली आहे. या प्रजातीचं नाव थेट एका प्रसिद्ध चित्रकारावरून ठेवण्यात आलं आहे. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केलं आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती, आकार, रचना, वॅन गॉग यांच्या 'द स्टारी नाईट' चित्राशी मिळते आहे. हा शोध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ असल्याचं फोर्ब्जने म्हटलं आहे. म्हणून याची आम्ही दखल घेत आहोत असंही आंतरराष्ट्रीय फोर्ब्ज या मासिकाने म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. अहमदनगर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ - Ahmednagar Health Department
  2. नार्वेकर यांच्याशी संपर्क नाही, मात्र आले तर स्वागतच करू, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य - Lok Sabha Election 2024
  3. ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI

ABOUT THE AUTHOR

...view details