पुणे- माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या मुलाला चार्टड विमानानं सुखरुप पुण्यात आणलं आहे. मात्र, माजी मंत्री सावंत यांनी खोटा गुन्हा दाखल करून मुलाला परत आणलं असल्याची टीका शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या," आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मंत्र्याची मुलं जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या सुरक्षिततेचं काय? अस एक विचार मनात आला. पण, समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं. तर तो मुलगा घरात भांडण करुन निघून गेला होता. त्या मुलाला अडवायचं आहे, म्हणून त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. पैसा आणि सत्ता यांचा गैरवापर करत खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करुन मुलाला परत आणलं. म्हणजे पैसा असणाऱ्यांना चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात. कसे रेट कार्पेट टाकलं जातं? पण, एरवी गोरगरीब माणसांच साधं तक्रार अर्ज देखील घेतले जातं नाहीत."
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे खासगी विमान परतले-सोमवारी दुपारच्या सुमारास माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा त्याचे मित्र प्रवीण उपाध्या आणि संदीप वासेकर यांच्यासोबत बजाज एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानानं बँकॉकला जायला निघाले. तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती चार वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी सर्व टीम कामाला लावली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं ऋषिराज सावंतला बँकॉकसाठी घेऊन जाणारे विमान पुण्यात परतले.