महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 10:13 PM IST

ETV Bharat / state

आक्षेपार्ह पोस्टनंतर वेंगुर्ल्यात तणावपूर्ण शांतता; दोघांवर गुन्हा दाखल

Sindhudurg Crime News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस प्रसिद्ध केल्याबद्दल मंगळवार २३ जानेवारी रोजी वेंगुर्ल्यात तणाव निर्माण झाला होता. या प्रकारामुळं वेंगुर्ले शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. तर या घटनेनंतर आज शहरात सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.

Sindhudurg Crime News
वेंगुर्ला पोलीस स्टेशन

सिंधुदुर्ग Sindhudurg Crime News : वेंगुर्ला येथे काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.

सर्व व्यवहार सुरळीत चालू : वेंगुर्ला येथील दोन युवकांनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. यासंदर्भात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केलंय. तर या घटनेनंतर आज शहरात सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत.

आरोपीवर गुन्हा दाखल : वेंगुर्ला पोलीस स्थानकात आज शांतता आणि दक्षता समितीची बैठक डीवायएसपी संध्या गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस निरीक्षक यांच्यासहित दोन समाज कमिटीचे सदस्य, व्यापारी संघाचे अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत सदर पोस्ट व्हायरल करणाऱ्या मास्टर माईंडवर गुन्हा दाखल केल्याची माहिती, डीवायएसपी संध्या गावडे यांनी दिली.

आक्षेपार्ह पोस्टवरून पेटला वाद: यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी चर्चा करून जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले. वेंगुर्ले येथे हा आक्षेपार्ह पोस्टवरून वाद पेटला होता. दरम्यान तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच पद्धतीने सावंतवाडी येथेही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


यांची होती उपस्थिती: यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, भूषण सारंग, परबवाडा उपसरपंच पपू परब, प्रीतम सावंत, भाई मालवणकर, अमित म्हापणकर, पंकज शिरसाट वृंदा मोर्डेकर, रवी शिरसाट, प्रणव गावडे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, अमित म्हापणकर, वैभव होडावडेकर उपस्थित होते.


हेही वाचा -

  1. सोशल मीडियावर मॉर्फ करून आक्षेपार्ह पोस्ट केले फोटो, पंजाबी अभिनेत्रीच्या ऑनलाईन तक्रारीनंतर गुन्हा दाखल
  2. Satara Crime : मुलाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; 'ही' धक्कादायक माहिती आली समोर
  3. Satara Crime : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी अल्पवयीन संशयित ताब्यात, कार्यालयाची तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details