मुंबई - दिवाळी सणानिमित्त आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार परंपरेनुसार सायंकाळी एक तासासाठी खुला करण्यात येतो. सहा ते सात या वेळेत शेअर बाजार खुला केला जातो. त्यावेळी गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद गुंतवणूक करण्यासाठी पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक तासामध्ये गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.
लक्ष्मीपूजन मुहूर्तावर शेअर बाजार एक तासासाठी खुला, गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद - DIWALI MUHURAT BSE
दिवाळीच्या लक्ष्मीपूजन मुहूर्तावर मुंबई शेअर बाजार एक तासासाठी खुला करण्यात आला. यावेळी गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
Published : Nov 1, 2024, 7:39 PM IST
|Updated : Nov 1, 2024, 9:37 PM IST
शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक - शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024 रोजी BSE आणि NSE एक्सचेंजमध्ये सायंकाळी एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राचं आयोजन केलं होतं. लक्ष्मी पूजेच्या दिवशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सुट्टी असली तरी संध्याकाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी ते फक्त एका तासासाठी उघडले गेले होते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ सायंकाळी सहा ते सात होती. दरम्यान, दिवाळीचा सण आणि त्यातच लक्ष्मीपूजन हा सुख, समृद्धी आणि भरभराटीचा दिवस मानला जातो. या दिवशी घर खरेदी, सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. तर शेअर मार्केटमध्ये एक तासासाठी फ्री ओपनिंग सत्र आयोजित केलं जातं. या एक तासामध्ये जर गुंतवणूक केली तर तिचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसून येतात, असं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या एक तासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं शेअर बाजारतज्ञ सिद्धार्थ कुवावाला यांनी ईटीवी भारतशी बोलताना सांगितलं.
बाजारात सकारात्मक वातावरण - लक्ष्मीपूजनच्या दिवशी बाजार एक तासासाठी खुला करण्याचं प्री ट्रेडिंग सत्राची 68 वर्षांची जुनी परंपरा आहे. तर दुसरीकडे जेव्हा सहा वाजता बाजार सुरू झाला तेव्हा 400 अंकानी वर होता आणि येणाऱ्या आगामी काळात बीएससी एक लाखाचा टप्पा ओलांडेल, असंही शेअर बाजार तज्ञ सिद्धार्थ कुवावाला यांनी सांगितलं आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचाही शेअर बाजारची परिस्थिती सुधारण्यास मोठा हात आहे. याचबरोबर बँकिंग सेक्टर, ऑइल, कृषी या सर्व क्षेत्रातून बऱ्यापैकी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. या एक तासात सुरुवात झाली ती एक सकारात्मक आणि आगामी काळात बाजारातील चांगले संकेत असल्याचंही बोललं जात आहे.