पुणे Action Against Pubs And Bar In Pune:राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत म्हणाले की, कल्याणी नगर येथील अपघातानंतर जवलापा येथील 49 पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या पूर्वी देखील एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने 57 पब आणि बारवर कारवाई करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
कारवाई पुढेही चालू राहणार :राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत पुढे म्हणाले की, या कारवाईमध्ये पब आणि बारच्या वेळा तसेच त्यांच्या प्रिमायसेसमध्ये काही बदल केला आहे. त्याचप्रमाणे रूफटॉप बाबत आलेल्या तक्रारी, विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
'चांदणी बार'ची छमछम कायमस्वरूपी बंद : नियमांना ढाब्यावर बसवून चालविल्या जाणाऱ्या बिअर बार विरुद्ध पोलीस आणि पालिका प्रशासन नेहमीच कारवाई करत असते. याचा प्रत्यय उल्हासनगर येथील चांदणी बारवर 31 डिसेंबर, 2021 रोजी करण्यात आलेल्या कारवाईतून आला. यावेळी उल्हासनगर शहरातील सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या चांदणी बारला सील करण्यात आले होते. पोलीस आणि महापालिकेने ही संयुक्तरित्या कारवाई केली होती. त्यामुळे 'चांदणी बार'ची छमछम कायमस्वरूपी बंद झाली होती.