मुंबई Sisters Day 2024 :'सिस्टर्स डे' दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी 4 ऑगस्ट 2024 रोजी 'सिस्टर्स डे' साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस बहिणींमधील विशेष प्रेमाचा उत्सव असतो. बहिणीत अनेकदा वाद होत असले तरी, त्या नेहमी एकीमेकींना मदत करताना दिसतात. त्यामुळं आपल्या लाडक्या बहिणीचा सन्मान करण्याचा एक विशेष क्षण तुमच्याकडं आहे.
'सिस्टर्स डे'चं महत्त्व : हा दिवस बहिणींना एकत्र वेळ घालवण्यासाठी प्रेरणा देतो. त्यामुळं त्यांच्यातील नातं आणखी मजबूत होतं. या दिनामुळं प्रेम भावनांना प्रोत्साहन मिळतं. आजचा दिवस बहिणींचं प्रेम, पाठिंबा तसंच मैत्रीबद्दल आभार मानण्याचा दिवस असतो. हा दिन साजरा करताना बहिणीसोबत लहानपणी घालवलेले क्षण, नवीन आठवणीमुळं त्यांच्यात प्रेमभावना निर्माण होते. तसंच त्यांना एकमेकांच्या सामाजिक, भावनिक जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या गरजासाठी प्रोत्साहन मिळतं. हा दिवस दोघींमधील ऋणानुबंधाची आठवण करून देतो.
असा करा सिस्टर्स डे साजरा :'सिस्टर्स डे'च्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला चांगलं गिफ्ट देऊ शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणींशी संपर्क साधून त्यांना बाहेर फिरायला नेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला निसर्गरम्य ठिकांनी जेवणाचा बेत सुद्धा आखता येऊ शकतो. तसंच त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवून बहिणीबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकता. अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचं नातं अधिक मजबूत करू शकता. जर तुम्हाला बहीण नसेल तर तुमच्या जवळच्या मैत्रिणींसोबत तुम्हाला चांगलं नियोजोन करता येईल. त्यांच्यासोबत लंच किंवा डिनरसाठी करून काही क्षण घालवता येईल. एकमेकांच्या यशाबद्दल, अडचणीबद्दल तुम्हाला यावेळी जाणून घेता येईल. त्यामुळं थोडा वेळ काढून तुमचे बंध अधिक घट्ट करू शकता. हा दिवस एखाद्या साहसासाठी देखील योग्य असू शकतो.
'सिस्टर्स डे'चा इतिहास :अमेरिकेत 'सिस्टर्स डे' साजरा करण्यास सुरुवात झाली. याची सुरुवात 1996 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मेम्फिस, टेनेसी येथील रहिवासी असलेल्या ट्रिशिया एलोग्राम यांनी केली होती. तेव्हापासून सिस्टर्स डे साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. बहिणींचा आदर करणे, तसंच त्यांच्यावरील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणी :
- दीपिका आणि अनिशा पदुकोण :अनिशा, दीपिका पदुकोणच्या मानसिक आरोग्य फाउंडेशनच्या लाइव्ह लव्ह लाफची सीईओ आहे. गोल्फ खेळताना तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलंय.
- कतरिना कैफ आणि इसाबेल कैफ :कतरिना कैफला सात बहिणी आहेत. त्यापैकी एक म्हणजे इसाबेल कैफ ही आहे. ती एक अभिनेत्रीदेखील आहे.
- आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट :आलिया तिची मोठी बहीण शाहीनच्या खूप जवळ आहे. ती एक लेखिका आणि पटकथा लेखक आहे. शाहीन आणि आलिया यांचं खूप जवळचं नातं आहे.
- जान्हवी आणि खुशी कपूर : जान्हवी आणि खुशी कपूरचे इन्स्टाग्राम फीड बोलकं आहे. धाकटी बहीण खुशीनं गेल्या वर्षी 2023 मध्ये जोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय.
- भूमी पेडणेकर आणि समिक्षा पेडणेकर : पेडणेकर बहिणी जुळ्यासारख्या दिसतात, पण त्यांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. भूमीची जुळी बहीण आणि तिचं अतूट नातं आहे. तिची बहीण समिक्षा पेशानं मॉडेल आणि वकील आहे.
- करीना कपूर आणि करिश्मा कपूर : करीना तसंच करिष्मा नंबर 1 अभिनेत्रीचे स्थान प्राप्त करणारी एकमेव जोडी आहे.
- काजोल आणि तनिषा मुखर्जी : तनिषा मुखर्जीनं खुलासा केला की, त्यांचे वडील मला आणि काजोलला टॉम अँड जेरी म्हणत असत. काजोल टॉम होती. तर मी जेरी होते. त्यामुळं घरात आमची टॉम अँड जेरी फेमस आहे.
- क्रिती सेनन आणि नुपूर सेनन :क्रिती आणि नुपूर एकमेकांच्या डुप्लिकेट दिसतात. क्रिती सेनननं 2014 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अल्पावधीतच ती लोकप्रिय अभिनेत्री बनली. दुसरीकडं, नुपूर सेनननं संगीतात करिअरला सुरुवात केलीय.