साताराMLA Shashikant Shinde: कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खासदार उदयनराजेंना (Politics) आयपीएलच्या संघाचे मालक म्हटले होते. त्याबाबत छेडलं असता खासदार शरद पवार यांनीच देशात आयपीएल आणली आहे. (Maharashtra Politics) त्यामुळे कोणता संघ खेळेल, कोणता खेळाडू पुढे येईल हे तेच ठरवतील, असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. (India Politics)
फक्त बाळासाहेबांनीच धाडस दाखवलं:बाबरी ढाचा पाडला त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हतं. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवलं. शिवसेनेनं बाबरी ढाचा पाडल्याची जबाबदारी घेऊन शिवसैनिकांचा अभिमान असल्याचं बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं. आज मात्र सर्वजण याचं श्रेय घेत आहेत. कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी असल्याचा टोला आमदार शशिकांत शिंदेंनी लगावला.
आरक्षणाचा प्रश्न किती दिवसात मार्गी लावणार?आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार? हे सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार केला पाहिजे. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारनं समाजात तेढ वाढू नये यासाठी प्रयत्न करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई ठप्प होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.