महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणेसह तिघांना अटक - sharad mohol murder case

Sharad Mohol Murder Case : गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी थरारक पाठलाग करून ताब्यात घेतलं आहे. गणेश मारणे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेनं नाशिक रोड येथून त्याला तिघांसह अटक केली आहे.

Sharad Mohol Murder Case Update
शरद मोहोळ हत्येप्रकरणी गणेश मारणेसह तिघांना अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 11:55 AM IST

Updated : Feb 1, 2024, 5:09 PM IST

पुणे Sharad Mohol Murder Case : गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (31 जानेवारी) रात्री बेड्या ठोकल्या आहेत.


15 जणांना अटक : शरद मोहोळ हत्येप्रकरणी आत्तापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गणेश मारणे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर बुधवारी (31 जानेवारी) रात्री गणेश मारणे त्याच्या दोन साथीदारांसह पुणे नाशिक रोड इथून पळून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार या तिघांना कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 302 ,307,201,120(ब), 34, आर्म्स अ‍ॅक्टच्या कलम 3,7,25,27 आणि मोक्का कायद्याच्या कलम 3(1)(i), 3(2),3(4) अंतर्गत ताब्यात घेण्यात आलंय. गुरुवारी (1 फेब्रुवारी) दुपारी या तिघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.


गणेश मारणेसह तिघांना अटक :याबाबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, 5 जानेवारीला पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन येथे 302 चा गुन्हा दाखल होता. सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात विठ्ठल शेलारसह आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. गुन्हे शाखेची 8 पथकं त्याच्या मागावर होती. गुन्हे शाखेची पथके तुळजापूर, बेंगलोर, रामेश्वर, केरळ, ओडीशा, अशा ठिकाणी पाठवण्यात आली होती. जेव्हा-जेव्हा पथकं या ठिकाणी जात होती, तेव्हा-तेव्हा मारणे पलायन करायचा. बुधवारी बातमीदारांच्या माध्यमातून मारणे नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पुणे शाखेची तीन पथकं नाशिकमध्ये पाठवण्यात आली, आणि गणेश मारणेसह त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं.



दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार :पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारीला दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी मोहोळवर मारेकऱ्यांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळला गोळी लागल्यावर त्याला पुण्यातील वनाज इथं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


हेही वाचा -

  1. शरद मोहोळ खून प्रकरण; मुख्य आरोपीनं जिथं पसरवली दहशत, तिथंच काढली पोलिसांनी धिंड
  2. शरद मोहोळ खून प्रकरणी गुंड विठ्ठल शेलारसह 6 जणांना अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
  3. शरद मोहोळच्या हत्येचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या कराडच्या तरूणास अटक
Last Updated : Feb 1, 2024, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details