मुंबई Eknath shinde : मार्मिकच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाचा आवाज राज्यात बुलंद केला. मात्र, प्रकृती स्वास्थ्याच्या तक्रारींमुळे त्यांना रूग्णालयात ॲडमिट करण्यात आलं आहे. त्यांना बसवण्यात आलेल्या पेस मेकरची बॅटरी बदलायची आहे. त्यासाठी मोठा खर्च होणार आहे. त्यांचं कार्य आणि शिवसेनेसाठी सावंत यांनी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवली आहे.
शिंदेंनी मदत करून बाजी मारली : शिंदे गटाकडून करण्यात आलेली ही मदत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निश्चितच चपराक असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांनी व्यक्त केलं आहे. "ज्या पंढरीनाथ सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला महाराष्ट्रभरात पोहोचवण्यासाठी परिश्रम केले, त्या सावंत यांना ठाकरे कुटुंबीयांकडून मदत मिळणं अपेक्षित असताना शिंदे यांनी मदत करून बाजी मारली आहे," असं दिलीप सपाटे म्हणाले.