महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या परिसरात अल्पवयीन मुलीसह बिबट्याचा आढळला मृतदेह, दोघांच्या मृत्यूबाबत गूढ - अजिंक्यतारा किल्ला

Satara news अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा सडलेला मृतदेह आढळून आला. त्याच ठिकाणी एका झाडावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

Satara news
Satara news

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 7:42 AM IST

सातारा Satara news- पर्यटकांची पसंती असलेला अजिंक्‍यतारा हा वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. या किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह सडलेल्‍या अवस्‍थेत आढळला. तर त्‍याच परिसरात झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्यानं साताऱ्यात खळबळ उडाली आहे. मृत अल्पवयीन मुलगी ही सातारा परिसरातील राहणारी आहे. तिनं आत्‍महत्‍या केल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. ही मुलगी एक महिन्‍यांपासून घरातून बेपत्ता होती.

उग्र वासामुळे घटना उघडकीस-अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याच्या बाजूकडून उग्र वास येत असल्‍याचे काही पर्यटकांच्या लक्षात आले. त्‍यानुसार काही जणांनी आजुबाजूला शोध घेतला. तेव्या त्यांना सडलेल्‍या अवस्‍थेत मुलीचा मृतदेह. त्यांनी आणखी शोध घेतला असता त्याच ठिकाणी झाडावर बिबट्या मृतावस्‍थेत आढळला. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी घटनास्‍थळी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी काही वस्‍तू मिळून आल्या. त्या वस्तुंवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.


सापडलेल्या वस्तुंवरून बेपत्ता मुलीची पटली ओळख -सातारा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीची नोंदी पाहताना पोलिसांना एका बेपत्ता मुलीचे वर्णन मिळतेजुळते असल्‍याचं लक्षात आलं. बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेणाऱ्या पालकांना पोलिसांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरील त्या घटनास्थळी नेले. मुलीच्या कुटुंबियांना कपडे आणि पैंजण तसेच इतर वस्‍तूंची ओळख पटली. तो मृतदेह मृत अल्पवयीन मुलीचा असल्याचं स्पष्ट झालं. मुलींच्या मृत्‍यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह सडलेल्‍या अवस्‍थेत असल्‍यानं पोलिसांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना घटनास्थळी पाचारण केले.



फांदीत अडकल्यानं बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू?वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह झाडावरुन खाली घेतल्यानंतर ते बिबट्याचे पिल्‍लू ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे स्पष्ट झाले. झाडाच्या फांदीत अडकल्‍यानं बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाजही वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतरच बिबट्याच्या पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेेंद्र मस्‍के यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे.

वन्यप्राण्यांच्या अधिवासावरील अतिक्रमणामुळे वाढल्या समस्या-जंगलाचे कमी होत जाणारे प्रमाण आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे अलीकडच्या काळात बिबट्यांचा शहरी तसेच ग्रामीण भागात शिरकाव वाढत चालला आहे. त्यातून मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष समोर आलेला आहे. नाशिकमधील एका घरात थेट बिबट्या शिरल्याची घटना समोरी आली होती. चिमुकल्यानं प्रसंगावधान दाखवित त्या बिबट्याला घरात कोंडले. तर पुण्यातील कात्रज उद्यानात असलेला बिबट्या गायब झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली होती.

हेही वाचा-

ABOUT THE AUTHOR

...view details