महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, काय म्हणाले सरकारी वकील? - WALMIK KARAD

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) बीड सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने बक्कळ जमीन आहे.

Santosh Deshmukh Murder Case
संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मिक कराड (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 4:10 PM IST

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. तर या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी : आज बीड सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यामध्ये वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे ही खंडणी प्रकरणातील सुनावणी होती. आवादा कंपनीच्या शिंदे नामक मॅनेजरला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात ही सुनावणी घेण्यात आली. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळं आता १४ दिवसाच्या कोठडीनंतर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया देताना सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे (ETV Bharat Reporter)



काय म्हणतात सरकारी वकील पाहा: "वाल्मिक कराडला व्हिसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. पोलीस यंत्रणेकडून त्याचा एमसीआर मागण्यात आला, तो दिला आहे. गरज पडली तर पुन्हा पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार ठेवून हा एमसीआर देण्यात आला. मकोका अंतर्गत 30 दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते. आरोग्याच्या कारणास्तव काही मागण्या होत्या, त्या आरोपीच्या वकिलाने केल्या होत्या. त्यावर माझं म्हणणं न्यायालयानं मागवलं नाही. जामीन संदर्भात बीड न्यायालयात अजून अर्ज दाखल झालेला नाही", अशी माहिती सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना शेतकरी मुकेश विठ्ठलराव रसाळ (ETV Bharat Reporter)

वाल्मिककराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 50 एकर जमीन :वाल्मिक कराडला दोन पत्नी आहेत, तर दुसऱ्या पत्नीला दोन मुलं आहेत. दुसऱ्या पत्नीच्या नावे देखील लाखो रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं निष्पन्न झालय. बीड पासूनच 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांजरसुंबा शिवारात तब्बल पन्नास एकर जमीन वाल्मिक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे केली आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 50 एकर जमीन मांजरसुंबा येथे असल्याचं आरोपात देखील सांगितलं होतं. विशेष म्हणजे या ठिकाणी एक रेस्टॉरंट होणार होतं. त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील मुरूम उकरून त्याच्या जमिनीमध्ये टाकला जात असल्याची माहिती बाजूच्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

वाल्मिक कराडकडं एवढा पैसा आला कुठून? :सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ज्योती जाधवच्या नावे जमीन सापडली आहे. त्याठिकाणी फळबाग लागवड करण्यात आली आहे. कराड कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही. मात्र ज्यांनी आम्हाला लातूरवरून या ठिकाणी आणलं आहे ते आम्हाला पगार देत आल्याची माहिती तेथे काम करणाऱ्या कामगारांनी दिली. मात्र, त्यामुळं वाल्मिक कराडकडं एवढा पैसा आला कुठून? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.



आम्हाला न्याय द्यावा :ज्योती जाधवने आमच्या बाजूला जमीन खरेदी केल्यापासून आम्हाला त्रास सुरू झाला. आमच्या शेतातील मुरूम उपसा करून स्वत:च्या शेतात भरला. आता यानंतर शेतकरी समोर आले असून त्यांनी 2024 च्या जुलै महिन्यापासूनच प्रशासनाकडं तक्रार केल्याचं सांगितलं. आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी मुकेश विठ्ठलराव रसाळ यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. बीड खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही आलं समोर; मनोज जरांगे पाटील, सुरेश धसांचा 'आका'वर गंभीर आरोप
  2. संतोष देशमुख खून प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, वाल्मिक कराडच्या सुनावणीवर वकील म्हणाले . . .
  3. संतोष देशमुख हत्याकांड; सहा आरोपींना न्यायालयात करणार हजर, तर वाल्मिक कराडच्या जामिनावर आज होणार फैसला

ABOUT THE AUTHOR

...view details