महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"कुंभ मेळ्यातील ९ हजार कोटी कुणाच्या खिशात गेले?" संजय राऊतांचा सवाल - MAHAKUMBH MELAVA 2025

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत 30 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut News
संजय राऊत महाकुंभ चेंगराचेंगरी दुर्घटना आरोप (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2025, 1:41 PM IST

Updated : Jan 30, 2025, 3:25 PM IST

मुंबई - "माझ्या माहितीप्रमाणं महाकुंभ मेळ्यातील मृत्यूचा आकडा १०० हून जास्त आहे. अनेकजण बेपत्ता आहेत. कुंभमेळ्याचं राजकीय मार्केटिंग सुरू आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला भाजपा आणि योगी सरकार जबाबदार आहे," अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थितीवरदेखील मत व्यक्त केलं.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ३०हून भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून योगी सरकार आणि भाजपावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपासह उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला.

भाजपाचे सीए किरीट सोमैय्या-खासदार राऊत म्हणाले,"कुंभ मेळाव्यासाठी दहा हजार कोटींचे बजेट होते. पण, एक हजार कोटी रुपयदेखील खर्च झाले नाहीत. भाजपाचे सीए किरीट सोमैय्या यांनी तिथे जायला पाहिजे. ९ हजार कोटी कोणाच्या खिशात गेले? ते पैसे कोणाच्या खात्यावर गेले, याचा ईडीला अहवाल द्यायला हवा. कशाप्रकारे अव्यवस्था होती? कशाप्रकारे दुर्लक्ष करण्यात आले? हे भाविकांनी माध्यमांना सांगितलं. ज्यांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कोणावर करावा, याचं उत्तर द्यावं. कुंभमेळ्यात भाजपाचे नेते आणि मंत्र्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती."

मराठा विरुद्ध ओबीसी या राजकारणात वाल्मिक कराडला प्याद म्हणून देवेंद्र फडणवीस वापरतील. सामाजिक वातावरण बिघडण्यासाठी राजकारण केलं जात आहे-संजय राऊत, खासदार

शिंदेची शिवसेनादेखील फोडली जाईल-भाजपाचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेबरोबर (यूबीटी) भाजपाची युती व्हावी, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपेक्षा व्यक्त केली. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजपाचे युतीचे समर्थक राहिले आहेत. ते आमचे- सगळ्यांचे मित्र आहेत. चंद्रकांत पाटील यांचे आभारी आहोत. भाजपात हौसे-नौसे-गौसे आलेत. त्यांना २५ वर्षांची भाजपा-शिवसेनेची युती कळालेली नाही. चंद्रकांत पाटील यांच्यासारखीच त्यांच्या पक्षातील अनेकांची भावना आहे. अमित शाह यांचा दिल्लीत उदय झाल्यानंतर शिवसेनेचे भाजपाबरोबर वितुष्ट आले. मुख्यमंत्री पदाचा दावा करताना आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले. अमित शाह यांना बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती. कारण, त्याचे आर्थिक हितसंबंध हे मुंबईत गुंतलेले होते. शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल," असा दावा खासदार राऊत यांनी केला.

हेही वाचा-

  1. प्रयागराजमधील दुर्घटनेनं 2003 च्या नाशिकमधील कुंभमेळ्याच्या दुःखद आठवणींना उजाळा, काय घडलं होतं?
  2. महाकुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू, करोडो भाविकांनी केलं अमृत स्नान
  3. महाकुंभ मेळाव्यात केवळ व्हीआयपीवर लक्ष केंद्रित, राहुल गांधींसह मल्लिकार्जून खर्गे यांची टीका
Last Updated : Jan 30, 2025, 3:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details