अमरावती Sanjay Raut Controversial Statement :अहमदनगर येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर यांच्याही जीवितास धोका :संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उच्च मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते. अशा विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.