मुंबई-पीएस आणि ओएसडीच्या नेमणुकांसाठी मंत्र्यांनी दिलेली १६ नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली नाहीत. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसंच १६ नावं जाहीर करण्याचं राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी, ''मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या यादीमध्ये १६ जण दलाल आणि फिक्सर होते. ही नावे माझ्याकडे आहेत. त्यात १३ ही शिेंदे शिवसेनेची आहेत. तर ३ राष्ट्रवादीची आहेत. शिंदे यांचा पक्ष हा अमित शाह यांचा पक्ष आहे. शिंदेंसह त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये समर्थांनी सांगितलेली मूर्खाची सर्व लक्षणे आहेत,'' असा टोला लगावला. फिक्सरला रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, अशा शब्दांत खासदार राऊतांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. राज्याच्या हिताच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो, असंही खासदार राऊत म्हणाले.
लूट मुख्यमंत्र्यांनी रोखली-पुढे खासदार संजय राऊत म्हणाले, "मागील घटनाबाह्य सरकारमध्ये अराजकता होती. राज्याच्या तिजोरीतून मोठी लूट करण्यात आली. ५०० कोटींचे कंत्राट हे ५ हजार कोटीपर्यंत वाढविण्यात येत होते. वर्क ऑर्डर निघण्यापूर्वीच कंत्राटदाराकडून ५०० कोटी रुपये घेण्यात येत होते. ही लूट मुख्यमंत्र्यांनी रोखली आहे. ठेकेदारीच्या भ्रष्टाचारातून राजकारणात पैसा ओतला जायचा. राजकारणातून पुन्हा भ्रष्टाचार व्हायचा. हे चक्र थांबविण्याचं प्रयत्न फडणवीस करत असतील तर हे चांगलं आहे."
काय आहे पीएस आणि ओएसडी नेमणुकीचा वाद?-मंत्र्यांना पीएस आणि ओएसडीदेखील नेमता येत नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, अशी आठवण करून दिली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र, फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात असणाऱ्यांना आपण मान्यता देणार नाही. आतापर्यंत 125 नावांपैकी 109 नावं क्लियर झाली आहे. उर्वरित नावं क्लिअर न करण्यामागे त्यांच्यावर असणारे आरोप आहेत. कोणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा-
- संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर केलेली टीका रास्त, शरद पवार यांची स्पष्टोक्ती
- "साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार," संजय राऊतांचा हल्लाबोल
- नितेश राणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, 'निधी'संदर्भातील वक्तव्यावर विनायक राऊत यांचा टोला