महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नो नेशन नो इलेक्शनची तयारी', संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल - Sanjay Raut Allegation

Sanjay Raut Allegation : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर वन नेशन वन इलेक्शन प्रकरणावरुन जोरदार टीका केली. केंद्र सरकारकडून नो नेशन नो इलेक्शनची तयारी सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Sanjay Raut Allegation
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 1:29 PM IST

Updated : Sep 19, 2024, 1:43 PM IST

मुंबई Sanjay Raut Allegation:केंद्रातील एनडीए प्रणित मोदी सरकारनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदी सरकारवर नो नेशन नो इलेक्शनची तयारी करीत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारनं आपल्या दोन टर्मच्या कार्यकाळात नोटबंदी, कलम 370 हटवणं, आयोध्येत राम मंदिर उभारणं अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेतले आहेत. वन नेशन वन इलेक्शन बाबत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए कायदा करण्याच्या तयारीत असून याबाबत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला आहे. या निर्णयाला एनडीएतील सर्वच घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याचं समोर येत आहे.

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Reporter)

वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी : "काल जी काही वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केलेली आहे. ती 2029 ची तयारी असून जे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत, त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा, हा मोठा झोल आहे," असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येक राज्यातलं वेगळं हवामान आहे. संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. आधी महानगरपालिकेच्या निवडणुका राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, असं आव्हान राऊत यांनी मोदी सरकारला केलं आहे. "वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी आहे. ही देशाच्या विरोधी कृती असल्यामुळे सदर भूमिकेला आमचा विरोध आहे. भविष्यात त्यांचा नो इलेक्शनचा नारा असू शकतो. आम्ही सगळे यावर बसून चर्चा करू. 'इंडिया' आघाडीत चर्चा करू. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं. ते अर्थमंत्री कधी झाले. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांनी नवीन घटना लिहू नये. देशाच्या दृष्टीनं हे काहीही फायद्याचं नाही. पैसे वाचवायचे आहेत, तर देशातली लूट थांबवा, निवडणुकातील खर्च दिसतोय पण लुट दिसत नाही," असा टोला देखील संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच :जागा वाटपाबाबत मतभेद असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जागा वाटपाची तुमच्याकडं आलेली माहिती चुकीची आहे. मीडियातल्या बातम्या पेरलेल्या आणि खोट्या आहेत. एखाद्या जागेवर मतभेद असू शकतात, परंतु त्यावर चर्चेनं तोडगा निघतो. बंद खोलीतल्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. जागावाटप झाल्यानंतर ते लपून राहणार नाही. ज्यांनी बातम्या दिल्या ते काय बैठकीला होते का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही राजकारणाची तेव्हाची गरज होती, असं राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं जागावाटप फायनल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समान नागरी कायद्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचं अजित पवार बोलत आहेत. यावर राऊत म्हणाले की, भाजपानं केला तर भाजपासोबत कोण आहे ? या खोट्या प्रचाराचा विरोध अजित पवार यांनी पुढं येऊन करावा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. हिमंत असेल तर निवडणुका घ्या : 'त्यांचा' गद्दारीत स्ट्राईक रेट मोठा, संजय राऊत यांचा हल्लाबोल - Sanjay Raut News
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; राऊत म्हणाले, "पक्ष संपवण्यासाठी मदत..." - Sanjay Raut On PM Narendra Modi
  3. गृहमंत्री पदावरुन संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; नागपूर प्रकरणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका - Sanjay Raut On Devendra Fadnavis
Last Updated : Sep 19, 2024, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details