महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय दिना पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल, सत्ताधारी खेळताहेत रडीचा डाव - Lok Sabha Election 2024

Sanjay Dina Patil filed candidature : महाविकास आघडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Dina Patil filed candidature
Sanjay Dina Patil filed candidature

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 10:01 PM IST

संजय दिना पाटील, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबईSanjay Dina Patil filed candidature : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (ठाकरे गट) उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील राऊत, आमदार सचिन अहिर उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर संजय दिना पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधारी रडीचा डाव खेळत असल्याची जोरदार टीका केलीय.

जातीयवादी शक्तीला बाहेर फेकू : गेल्या काही दिवसांपासून आम्ही प्रचार करत आहोत. तापमानात वाढ झाली असली, तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळपासूनच लोकांमध्ये निवडणुकीचा उत्साह दिसून येत आहे. आता आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. आज मला लोकांकडून पाठिंबा, आशीर्वाद मिळत आहेत, असं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. जातीयवादी शक्ती बाहेर फेकण्याचं काम आम्ही करू, असं संजय दिना पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर सांगितलं.

भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली :दुसरीकडं भाजपाचे मिहीर कोटेचा हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील रिंगणात आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मिहीर कोटेचा भांडुप येथील मैदानावर प्रचार सभा घेणार आहे. यावेळी आपल्यावर दगडफेक होऊ शकते, असा आरोप मिहीर कोटेचा यांनी केला आहे. यावर बोलताना संजय दिना पाटील म्हणाले की, सध्या सरकार त्यांचं आहे. त्यांनी अधिक संरक्षणासह तिथं जावं. त्यांच्यावर कोणी दगडफेक करणार नाही. आता महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. फक्त त्यांची नौटंकी सुरू आहे. संजय दिना पाटील यांनी मिहीर कोटेचा यांच्यावर टीका केली.

लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत : आज आमच्या पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कल्याणमधून आमच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मी येथे आलो आहे. आज महाराष्ट्र एका वेगळ्या वाटेवर आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. देशातील हुकूमशाही विरोधात तसंच लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान जपण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महाविकास आघाडीला राज्यात सर्व स्तरातून चांगला पाठिंबा मिळत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha
  2. संजय राऊत यांना स्किझोफ्रेनियाची लक्षणे - विजय शिवतारे - Sanjay Raut
  3. मोदी हे स्वतःच अतृप्त आत्मा...; लोकनियुक्त सरकारं पाडणं ही त्यांची महत्वाकांक्षा, नाना पटोले यांचा टोला - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details