महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश; तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूल सापडली - Salman Khan House Firing - SALMAN KHAN HOUSE FIRING

Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) याच्या घरावरील गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी गुजरातमधील सुरत शहरात तापी नदीत (Tapi River) शोध मोहीम राबवली होती. अखेर आरोपींनी तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूलं शोधण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Police) पथकाला यश आलंय.

Salman Khan House Firing
सलमान खान गोळीबार प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 7:30 PM IST

तापी नदीत फेकून दिलेली दोन्ही पिस्तूलं सापडली

मुंबई Salman Khan House Firing: बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या वांद्रे येथील राहत्या घरावर रविवारी 14 एप्रिल रोजी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर गुजरात या राज्यात पळून गेलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन आरोपींना भुज येथील मंदिरातून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र, वाटेतच या दोन्ही आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल आणि एक दुचाकी चालकाकडं असलेली पिस्तूल नष्ट करण्याच्या हेतूनं तापी नदीत फेकून दिली होती. ही दोन्ही पिस्तुलं अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला (Mumbai Police) सापडली आहेत.

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला यश: सोमवारी सकाळपासून मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाचं तापी नदीमध्ये शोध मोहीम सुरू होती. यासाठी पिस्तूल फेकून दिलेले स्थळ दाखवण्याकरिता आरोपी विकी गुप्ता याला पथकानं सोबत नेलं होतं. तसेच स्थानिक मच्छीमार आणि मरीन कंपनीची मदत घेऊन मुंबई पोलिसांनी यशस्वीरित्या शोधमोहीम पार पाडली. तापी नदीमध्ये सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाला एक पिस्तूल सापडली होती. या सुरू असलेल्या ऑपरेशन दरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला आता दोन पिस्तूलं, तीन मॅगझीन आणि 13 जिवंत काडतुसे सापडली आहेत.


गोळीबाराचा सराव पिस्तूल ठेवली सोबत : 10 मार्चच्या आसपास विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन्ही आरोपींना पनवेल येथील राहत्या घरी पंजाब आणि हरियाणामध्ये असलेल्या बिश्नोई गँगच्या लोकांनी दोन पिस्तुले आणून दिली होती. त्यानंतर 24 मार्चला होळी दरम्यान हे दोघे देखील बिहार येथे आपल्या गावी पश्चिम चंपारणमध्ये गेले होते. तेथे हे दोघेही सोबत एक पिस्तूल घेऊन गेले. एका पिस्तूलने बिहारमध्ये गोळीबाराचा सराव केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानी दिली आहे.

आठ ते दहा जणांचे नोंदवले जबाब :त्याचप्रमाणं विओआयपी आणि टेलिग्रामच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईसह बिश्नोई गॅंगचे साथीदार आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांच्या संपर्कात होते. सलमान खान याच्या घरावर आरोपी सागर पाल याने गोळीबार करत पाच राउंड फायर केले होते. त्यानंतर ते प्रथम ट्रेनने सांताक्रुज येथे उतरून नंतर वाकोला येथून प्रायव्हेट कॅब बुक करून गुजरातमध्ये पोहोचले. सुरतपर्यंत पोहोचल्यानंतर पुढे आमदाबाद भुज असा प्रवास बसने केला. दरम्यान ज्या कॅब चालकानं या दोन्ही आरोपींना सुरतपर्यंत सोडले. त्या कॅब चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत आठ ते दहा जणांचे जबाब नोंदवले असल्याची माहिती, गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. सलमान खान गोळीबार प्रकरण; गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा लागला शोध - Salman Khan House Firing
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण : वांद्रे पुलाखाली पिस्तूल पुरवणारी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर - Salman Khan firing case
  3. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing

ABOUT THE AUTHOR

...view details