मुंबई- अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मूळचा बांगलादेशी रहिवासी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. अटकेतील आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद (वय ३० ) आहे.
मुंबई पोलिसांह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात घुसणाऱ्या चोराला शनिवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. त्याच्या अटकेबाबत मुंबई पोलीस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांनी माहिती दिली. त्यांनी म्हटलं, "१६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो दरोड्याच्या उद्देशानं अभिनेता सैफच्या घरात घुसला होता."
आरोपीच्या अटकेबाबत पोलिसांनी काय दिली माहिती? (Source- ANI) आरोपी बांगलादेशी असल्याचा कशामुळे संशय?पोलीस उपायुक्त दीक्षित म्हणाले,"आरोपी काही दिवस मुंबईतदेखील राहिला होता. तो हाऊस कीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. आरोपीनं घुसखोरी करून भारतात प्रवेश केल्याचा संशय आहे. घुसखोरी केल्यामुळेच मोहम्मद हे नाव बदलून विजय दास असं नाव ठेवलं असावं. त्यानं चौकशी दिलेलं उत्तर आणि त्याच्याकडील साहित्य पाहता तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे. आरोपीकडं भारतीय असल्याचा एकही पुरावा नाही".
अटकेची कारवाई कशी झाली?शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांना हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीनं पळून जाऊ नये, याकरिता झोन ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढबाळे यांना माहिती देण्यात आली. पोलीस उपायुक्त नवनाथ यांची टीम तात्काळ रवाना झाली. सोबत गुन्हे शाखेची टीमही घटनास्थळी पोहोचली. आरोपीला पोलीस आल्याचं माहिती मिळताच तो जंगलातील दाट झुडुपात लपून बसला. त्याला शोधण्यात अडचण असल्यानं पोलिसांनी टॉर्च आणि मोबाईल टॉर्चचा वापर केला. गुन्हे शाखा आणि पोलिसांनी आरोपीला सर्व बाजूंनी झुडुपात घेरले. रात्री २ वाजण्याच्या सुमारास अथक परिश्रमानंतर आरोपीला काटेरी झुडपांमधून अटक करण्यात आला.
- आरोपी मोहम्मद हा ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील ब्लेबर नावाच्या हॉटेलमध्ये काम करत होता. विशेष म्हणजे आरोपीला हॉटेलमध्ये सर्वोत्तम कर्मचारी म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यानं हॉटेलमधील नोकरी सोडली होती. आरोपीला आज वांद्रे पोलिसांकडून सुट्टीकालीन न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
हेही वाचा-
- सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, वेटर म्हणून केलं होतं काम
- अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित छत्तीसगडमध्ये ताब्यात, मुंबई पोलीस घेणार ताबा