मुंबई -अभिनेता सैफ अली खानवर घरात हल्ला केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट आहे. अभिनेत्यावरील हल्ल्याच्या 33 तासानंतर पोलिसांनी संशियाताला ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याचीदेखील संशयितानं रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांच्या २० पथकांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेतलेला आरोपीचं हल्लेखोर?आरोपी वांद्रा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीतही कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. आरोपी हा वसई, विरार नालासोपाऱ्याच्या दिशेनं गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयितानंच अभिनेता सैफवर हल्ला केला का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
- किंग खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न-अभिनेता शाहरुख खान याचा वांद्रे येथील बँड स्टँड येथे मन्नत बंगला आहे. या मन्नत बंगल्यात दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीनंच सैफ अली खानवर हल्ला केलाय का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
- हल्ल्यानंतर सैफ अली खान जखमी झाल्यामुळे त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी सैफ अली खानच्या शरीरातील काढलेला ब्लेडचा तुकडा पुराव्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सध्या तपासासाठी पोलिसांचे पथक सैफच्या घरी दाखल झालं आहे.