पुणे (आळंदी)Mohan Bhagwat : श्रीक्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या (Govinddev Giri Maharaj) ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते झाला. यावेळी सरसंघचालक भागवत म्हणाले, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी उपस्थित राहता आलं, हे आपलं भाग्य आहे. आपले श्रीराम 22 तारखेला आले. अनेक संघर्ष झाले. अनेक पुरुषार्थ करण्यात आले. पण, या पिढीच्या नशिबात रामाचं दर्शन होतं. माझं भाग्य होतं की, मला त्या सोहळ्याला उपस्थित राहता आलं.
ग्रामीण भागातील बांधवही विज्ञाननिष्ठ:राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक आणि आचरण करणं हे सर्व संत महंतांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचं डॉ. भागवत यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळं हे शक्य होत आहे. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान, तंत्रज्ञान समजू शकत नाही, असं अनेकांना वाटतं;. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात. हे अनेकवेळा सिद्ध झालं आहे.
'आरएसएस'बद्दल काय म्हणाले गोविंद देवगिरी महाराज?यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रकाशित केलेलं डाक तिकीट स्वामी गोविंद देवगिरी महाराजांना यावेळी भेट म्हणून पाठवले. भाजपाचे माजी उपाध्यक्ष शाम जाजू, आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डॉ. मोहन भागवत यांनी ते प्रदान केले. ️यावेळी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्तीचं मुक्त विद्यापीठ असून सेवाव्रती कार्य करत राहणार आहे. सर्व न्यासाचे केंद्र भगवदगीता असून आळंदीमध्ये बसून श्रीमद् भागवत श्रवण करणं हीच मनोकामना आहे. ''देश से प्रेम तो हर पल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू ये देश रहना चाहिए'', अशी भावनिक देशभक्तीपर साद त्यांनी उपस्थितांना घातली.
- महाभारत विषयक पहिल्या खंडाचं प्रकाशन:यावेळी श्रीधरपंत फडके, डॉ. शरद हेबाळकर, मुकुंदराव गोरे, प्रकाश सोमण, अशोक वर्णेकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी लिहिलेल्या महाभारत विषयक पहिल्या खंडाचं प्रकाशन यावेळी पार पडलं. ️
हेही वाचा:
- विनायक सावरकरांना भारतरत्न मिळाला नसल्याबाबत पणतू रणजीत सावरकर यांनी केलं मोठ वक्तव्य
- "पाकिस्तानी कलाकार खपवून घेतले जाणार नाहीत" : मनसेचे अरिजीत सिंगला थेट आव्हान
- पंतप्रधान मोदींची नेहरु, इंदिरा गांधींसह काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका; तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची 'मोदींची गॅरंटी'