महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून दिवाळीचा फराळ निघाला परदेशात, यंदा फराळाच्या किंमतीत 25 टक्के वाढ - DIWALI FARAL

दिवाळी (Diwali 2024) फराळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच यंदा फराळाच्या किंमतीत 25 टक्के वाढ झालीय. ठाण्यातून दरवर्षी परदेशी फराळ जात असतो.

Diwali 2024
दिवाळी 2024 (Etv Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2024, 7:12 PM IST

ठाणे : अवघ्या काही दिवसांवर 'दिवाळी' सण (Diwali 2024) येऊन ठेपला आहे. त्यासाठी बाजार फुलला असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झालीय. दिवाळी आणि फराळ हे दरवर्षीचं समीकरण आहे. आजच्या घाई गडबडीच्या काळात कामासाठी विदेशात गेलेल्या नागरिकांना फराळ करायला वेळ नसतो. त्यामुळं रेडिमेड फराळ (Readymade Diwali Faral) मागवण्याकडं नागरिकांचा कल वाढला आहे.

27 देशात पाठवला जातो फराळ :मुख्यमंत्र्यांचा जिल्हा अशी अलिकडे ओळख निर्माण झालेल्या ठाण्यातील 'ऋतू फुड्स' हे दरवर्षी हजारो किलो फराळ विदेशात पाठवत असतात. ऑट्रेलिया, दुबई, युके अशा वेगवेगळ्या 27 देशात सुमन परचुरे दिवाळीचा फराळ पाठवतात. या फराळात मराठी स्वाद असल्यामुळं जगभरातून फराळाची मागणी असते. दरवर्षी फराळाच्या ऑर्डरमध्ये वाढ होत असून त्यासाठी पूर्वतयारी एक महिन्यापासून सुरू आहे. आता शेवटच्या टप्प्यात पॅकींग करून कुरिअर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना सुमन परचुरे (ETV Bharat Reporter)


यंदा 25 टक्के फराळ महाग :दिवसेंदिवस तेल, डाळ, इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. यावर्षी रेडिमेड फराळच्या किंमतीमध्ये त्यामुळे 25 टक्के वाढ झाली आहे. परंतु ग्राहकांच्या मागणीमध्ये कमतरता नाही. कुरिअरच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळं त्याचा परिणाम सर्वच पदार्थांच्या किंमतीवर झाला आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परदेशातल्या नागरिकांना फराळाची लज्जत चाखता यावी यासाठी ठाण्यातून दरवर्षी फराळ परदेशात पाठवला जातो. ठाण्यातील ऋतू फुड्सचे पदार्थ महिनाभर टिकतात. कारण त्यात चांगल्या प्रतीचं तेल, तूप वापरलं जातं आणि त्याचा परिणाम पदार्थ टिकण्यावर होतो. - सुमन परचुरे ,विक्रते



भारताला मिळतय परकीय चलन: दरवर्षीच्या या व्यवसायातून सुमन याना फायदा तर होतोच. मात्र, या व्यवसायामुळं भारताला परकीय चलन देखील मिळत आहे. जगभरातून येणाऱ्या ऑर्डरमुळं त्याचा फायदा देशाला देखील होत आहे.


हेही वाचा -

  1. मुंबईतून 176 देशांमध्ये निघाला दिवाळी फराळ; कोट्यवधींची होते उलाढाल, उद्योजकाने सांगितली 'ईटीव्ही न्यूज'ची खास आठवण
  2. Diwali 2023 : दिवाळे गावाची अनोखी दिवाळी; समुद्रातून मूर्ती शोधून साजरा करतात दिवाळी सण, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details