महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिंदे गटाच्या नेत्यांचं ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 'घर छोडो' आंदोलन, प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड - घर छोडो आंदोलन

Dr Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी मागील 30 वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या मागणीला यश आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर आता रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेनं 'घर छोडो' आंदोलन सुरू केलं.

ramabai brigade womens association agitation for dr babasaheb ambedkar memorial  in shahapur
30 वर्षांच्या संघर्षानंतरही डॉ.आंबेडकर स्मारकासाठी 'घर छोडो' आंदोलन, प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 8:57 PM IST

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ठाण्यात 'घर छोडो' आंदोलन

ठाणे Dr Babasaheb Ambedkar Memorial : शहापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी गेल्या 30 वर्षांपासून शहापूर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी शासनाकडे पत्र व्यवहार करून लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करत आहे. परंतु शासन यावर नेहमी दुर्लक्ष करत असल्यानं याच्या निषेधार्थ आता रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांनी कुटुंबासह घर छोडो आंदोलन तहसील कार्यलयाच्या आवारात सुरू केलं आहे. तसंच आंदोलनास्थळीच संसार उपयोगी वस्तूसह चूलही मांडण्यात आली आहे.

...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार :आंदोलनकर्त्या ज्योतीताई गायकवाड या शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आंदोलनाला किती गांभीर्यानं घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे जोपर्यत मुख्यमंत्री आंदोलनस्थळी येत नाही, तोपर्यंत ‘घर छोडो’ आंदोलन सुरूच राहणार आहे.


...म्हणून होत आहे स्मारकाची मागणी :शहापूर न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका दाव्यासाठी आले होते. त्यामुळं त्यांच्या पदपर्शाने पुण्य झालेल्या शहापूर शहरात त्यांची आठवण म्हणून स्मारक करण्याची मागणी गेल्या 30 वर्षापासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर होत असलेल्या घर छोडो आंदोलनाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली असून हा मोर्चा तहसील कार्यलयापर्यंत काढण्यात आला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2023 मध्ये शहापूर नगरपंचायत मुख्यधिकाऱ्यांनी विश्रामगृहाच्या आवारात डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यास ठराव मंजूर करून तो लेखी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर आणि तहसीलदार यांच्या मंजूरीसाठी पाठवला होता. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी ठाम :डीवायएसपी मिलिंद शिंदे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे, नगरपंचायतचे मुख्य अधीकारी, गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन न मिळाल्यानं रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी ठाम असल्याचं दिसून आलं.

हेही वाचा -

  1. दहा एकर जागेत सावित्रीबाईंचे भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
  2. भिडे वाड्यात महात्मा फुलेंचे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा, पोलीस बंदोबस्तात पुणे महापालिकेनं मध्यरात्री पाडले बांधकाम
  3. हुतात्मा गोवारी स्मृती दिवस; 29 वर्षांनंतरही गोवारी समाज लढतोय अस्तित्वाची लढाई, जाणून घ्या इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details