महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 35 किलोची भव्य राखी अर्पण; छत्तीसगडच्या भक्तानं तयार केली खास राखी - Raksha Bandhan 2024

Raksha Bandhan 2024 : राज्यभरात श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधनानिमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. साईंच्या शिर्डीतही मोठ्या भक्तीभावानं आणि आस्थेनं राखी पौर्णिमा उत्सव (Shirdi Saibaba Raksha Bandhan 2024) साजरा करण्यात येतोय. रक्षाबंधनानिमित्तानं छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील एका साईभक्तानं तब्बल 36 फूट लांब राखी साईबाबांना अर्पण केली.

Shirdi Saibaba Raksha Bandhan 2024
साईबाबांना 35 किलोची राखी अर्पण (Source : ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 1:52 PM IST

Updated : Aug 19, 2024, 2:07 PM IST

शिर्डी(अहमदनगर) Raksha Bandhan 2024 : शिर्डीमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला जात आहे. साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी (Shirdi Saibaba Raksha Bandhan 2024) केली आहे. तसंच साईबाबांना राखी बांधण्यासाठीही भाविक गर्दी करत आहेत. बिलासपूर येथील एका साईभक्त परिवारानं तब्बल 36 फूट लांब राखी साईबाबांना अर्पण केली.

साईबाबांना 35 किलोची राखी अर्पण (Source : ETV Bharat Reporter)

35 किलो वजनाची राखी : देशभरातील लाखो भगिनींनी रक्षाबंधनानिमित्तानं साईबाबांना राख्या पाठवल्या आहेत. सर्वांचं लक्ष वेधुन घेतेय ती एक आगळीवेगळी आणि अवाढव्य राखी. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील एका साईभक्त परिवाराकडून 35 किलो वजनाची 36 फूट लांब व 5 फूट रुंद अशी राखी साईबाबांच्या चरणी अर्पण केली. ही भव्य राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांत बनवली. फायबर प्लाय, मोती, जडी-बुटी, जरी यापासून ही राखी तयार करण्यात आली. सुबक आणि सुंदर कारागिरी या राखीवर करण्यात आली. साईबाबांनी आपल्या अंतिम समयी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविधा भक्ती म्हणून नऊ नाणी दिली होती. ही थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे. प्रत्येक नाणी ही श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचं एक वैशिष्ट्य दर्शवते. तेच या राखीमध्ये समाविष्ट केलं असल्याचं प्रबोधराव यांनी सांगितलं.

भव्य राखी साईबाबांना अर्पण : ही राखी मोठी असल्यानं साईबाबांच्या मंदिरात न ठेवता मंदिर परिसरात ठेवण्यात आली. साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या पत्‍नी वंदिना गाडीलकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या पत्‍नी ज्‍योती हुलवळे तसंच राखी देणगीदार साईभक्‍त प्रबोधराव यांच्या हस्‍ते या राखीचे विधीवत पूजन करण्यात आलं. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्‍णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

साईबाबांना 35 किलोची राखी अर्पण (Source : ETV Bharat Reporter)

साईबाबांना बांधली राखी : साईंच्या शिर्डीत सगळेच उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांना मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर साई मूर्तीला भरजरी वस्र परिधान करण्यात आलं. आज रक्षाबंधनानिमित्तानं भाविकांनी आणलेली सुंदर राखी साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीच्या हातात साई मंदिर पुजाऱयांच्या हस्ते बांधण्यात आली.

साईबाबांना 35 किलोची राखी अर्पण (Source : ETV Bharat Reporter)

शिर्डीत रक्षाबंधनाचा उत्साह : साईबाबा असताना शिर्डीतील महिला त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत, असं आताचे गावकरी सांगतात. आज ही परंपरा साई संस्थान आणि भाविकांकडून सुरू आहे. दरवर्षी भाविक रक्षाबंधनच्या दिवशी बाबांना राखी घेऊन येत असतात. याही वर्षी भाविकांनी बाबांना अतिशय सुंदर राख्या आणल्या आहेत. सकाळी बाबांना राखी बांधल्यानंतर शिर्डीतील रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली.

साईबाबांना 35 किलोची राखी अर्पण (saibaba)

साई मंदिरात श्रावणी सोमवार साजरा : श्रावणी सोमवार निमित्तानं साईंच्या मूर्तीला बेलपत्राची माळही साईबाबा संस्थानच्यावतीनं घालण्यात आली. तसंच महादेवाची प्रतिमा साईबाबांच्या समाधीसमोर ठेवण्यात आली. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

हेही वाचा -

  1. नागपुरातील विद्यार्थ्यांनी तयार केली भव्य इको फ्रेंडली राखी; पाहा व्हिडिओ - Raksha Bandhan 2024
  2. खासदार सुप्रिया सुळेंनी 'खासदार' भावाला बांधली राखी; अजित पवार म्हणाले, "हा दादा कायम..." - Raksha Bandhan 2024
  3. पद्मश्री राहीबाईंनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बनवली खास ‘बीज राखी’ - Raksha Bandhan Special Rakhi
Last Updated : Aug 19, 2024, 2:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details