पुणे Man Sexually Assaults To Girls : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह पुणे शहरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरात मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नामांकित शाळेतील 6 वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर चालत्या बसमध्ये चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संजय जेटींग रेड्डी असं चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे.
स्कूल बस चालकाचा दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार :याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वानवडी परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये ने आण करण्यासाठी दोन मुलींना कुटुंबीयांना बस लावली. मागील काही दिवसांपासून व्हॅन चालक हा पीडित मुलींना पुढच्या बाजुला बसवून अश्लील चाळे करायचा. यातील तक्रारदार यांची मुलगी आणि तिच्या मैत्रीण 30 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येत होत्या. यावेळी बस चालकानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडितेनं तिच्या पालकांना दिल्यानं त्यांनी तत्काळ वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानं नराधम संजय जेटींग रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन मुलींवर अत्याचार :चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी संजय रेड्डीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, नुकतच बदलापूर इथं दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचं प्रकरण देशभर गाजलं असताना आता पुन्हा पुण्यात दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली आहे.