पुणे Pune Police Drug Seized in Delhi : मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात ड्रग्जविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचं हजारो किलो ड्रग्ज जप्त (Pune Police Drug Action) केलं होतं. यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट नवी दिल्लीत कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं तब्बल 600 किलो ड्रग्ज जप्त केलंय. गेल्या तीन दिवसांत तब्बल 4 हजार कोटींचं 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय.
ड्रग्ज पेडलरचे धाबे दणाणले : पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी (20 फेब्रुवारी) पुण्यातील विश्रांतवाडी आणि कुरकुंभ भागात 1100 कोटी किंमतीचं एकूण 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. यात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे पुणे पोलीस पथकानं देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात मोठी कारवाई करत 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.
पुणे पोलिसांची दिल्लीत कारवाई : ड्रग्ज मुक्त मोहीम : पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच 'ड्रग्ज मुक्त पुणे' ही मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पुण्यात मंगळवारी कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांकडून दिल्लीत आणखी एक कारवाई करण्यात आलीय. दिल्लीत 600 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. याची किंमत 1200 कोटी रुपये इतकी आहे. पुणे पोलिसांनी अवघ्या 3 दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय. गेल्या तीन दिवसांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.
तीन दिवसात 4 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त : पुणे पेलिसांनी 18 फेब्रुवारी रोजी सोमवार पेठेत छापेमारीत 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. याप्रकरणी 3 जणांना अटकही करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक तपास केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटींपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात 1100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी नवी दिल्लीत कारवाई करत तब्बल 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.