कोल्हापूर Pune Hit And Run Case: पुण्यात दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्यांच्या रक्ताचे अहवालच डॉक्टर बदलत आहेत, अशा डॉक्टरांना आमदार आणि मंत्र्यांकडून पाठबळ मिळालं. शवविच्छेदन अहवालासह अनेक गैरकृत्यांचे आरोप असणाऱ्या डॉ. अजय तावरेची अधीक्षक म्हणून शिफारस होतेच कशी? प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मंत्र्यांनीच अधिष्ठाता काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळं पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरणार असल्याचा इशारा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलाय. यामुळं आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार पटोले कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (ETV BHARAT Reporter) मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पोलीस, डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि आता मंत्र्यांची नावं या प्रकरणाशी जोडली जात आहेत. पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना शिफारस केलेलं पत्र आता माध्यमांसमोर आलय. त्या पत्रात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आपल्या शिफारशीसह डॉ. अजय तावरे यांना अधीक्षक करण्याचा अभिप्राय दिलाय. यामुळं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गृहखातं नेमकं करतं तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांना पक्ष फोडण्याशिवाय दुसरं कोणतं काम आहे का, असा प्रश्न विचारत पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर नेमलेली चौकशी समिती आणि यातील सदस्य यांच्यावरही यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळं ही चौकशी निपक्ष होईल की नाही याबाबत शंका आहे. यामुळं आता पुण्यातील हिट अँड रन प्रकरण राज्यातील सभागृहाच्या पटलावर मांडून या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारला घेणार असल्याचा स्पष्ट इशारा, नाना पटोले यांनी दिला.
दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या निधनानं मित्र गमावला : काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील हे माझे चांगले मित्र होते. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गतिमान करण्यासाठीचं योगदान दिलं. त्यांच्या निधनाने एक मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया, नाना पटोले यांनी व्यक्त केलीय. आमदार पाटील यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी पाटील कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आमदार जयश्री जाधव, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, राहुल पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update
- पुणे हिट अँड रन प्रकरण: डॉ.अजय तावरे यांचं निलंबन नव्हे तर त्यांना फासावर लटकवा - विजय वडेट्टीवार - Pune Hit And Run Case
- पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या वडिलाचं महाबळेश्वर कनेक्शन, लीजवरील मिळकतीत बांधलं पंचतारांकित हॉटेल! - Pune Porsche Accident Case