महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे आहे अंडरवर्ल्ड कनेक्शन, पोलिसांनी वरदहस्त दाखविल्यानं टळली अटक - pune hit and run accident - PUNE HIT AND RUN ACCIDENT

पुणे शहरातील बहुचर्चित अपघात प्रकरणात आता नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. अल्पवयीन मुलानं अतिवेगात वाहन चालवून अपघात केला. या अपघातात दोन निष्पापांचा बळी घेतल्यानंतर त्याच्या आजोबांचे थेट अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत संपर्क असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या कुटुंबाला यापूर्वीदेखील राजेशाही वागणूक दिल्याचे समोर आले आहे.

pune hit and run accident
pune hit and run accident (Source- ETV Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 1:29 PM IST

मुंबई - पुणे शहरातील कल्याणनगर अपघातात आरोप असलेल्या अल्पवीयन मुलाच्या कुटुंबावर पोलिसांचा यापूर्वी देखील वरदहस्त राहिला आहे. अल्पवयीन मुलाच्या आजोबांवर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत संपर्क करुन हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांकडून अटक झाली नाही.

अल्पवयीन मुलाचे आजोबाचे त्याचे बंधू यांच्यासोबत आर्थिक कारणांवरुन वाद होते. त्या वादातून अल्पवयीन मुलाच्या आजोबानं त्यांच्या भावाचे सहकारी असलेल्या अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी थेट छोटा राजनला दिली होती. त्यानंतर त्यांच्या त्याच्या गुंडांनी भोसले यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी छोटा राजन व इतर आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार आणि सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या आरोपा विरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे त्यांना अटकदेखील करण्यात आली नाही.

अंडरवर्ल्ड संबंध असल्याचे उघड -आर्थिक लागेबांधे असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात मकोका लावण्यत आला नसल्याचा आरोप केला जात आहे. एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 जून रोजी होणार आहे. अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध समोर आल्यानं या प्रकरणानं वेगळे वळण घेतलं आहे. अल्पवयीन मुलाच्या आजोबाविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नातवाला जामीन मिळण्याकरिता हमी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्ड संबंध असल्याचे उघड झाल्यानं मोठी खळबळ झाली आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी-पुण्यातील अपघातावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागणी केली आहे. त्यांनी एक्स मीडियात पोस्ट करून म्हटले, "देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होता,त गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली. तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले. दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?

हेही वाचा-

  1. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला आज बाल हक्क न्याय कोर्टात हजर करण्यात येणार, काय होणार कारवाई? - pune porsche accident update
  2. राहुल गांधींचा पुणे अपघातावरून पंतप्रधान मोदींवर हल्ला, हिट अँड रनमध्ये आजपर्यंत काय घडलंय? - Pune Accident updates

ABOUT THE AUTHOR

...view details