महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू, इंडिया आघाडीच्या कलानंतर राऊतांचा 'एनडीए'ला टोला - Lok Sabha Election 2024 Results - LOK SABHA ELECTION 2024 RESULTS

Lok Sabha Election 2024 Results : सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024 Results) मतमोजणी सुरू आहे. यावेळी एक्झिट पोलमध्ये भाजपा एकटीच सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक, सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात निकराची लढत असल्याचं दिसतंय. यावर उद्धव ठाकरे गटनेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

Lok Sabha Election 2024 Results
संजय राऊत, नरेंद्र मोदी (ETV BHARAT Maharashtra Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 12:52 PM IST

मुंबईLok Sabha Election 2024 Results :सध्या लोकसभा निवडणुकीची (लोकसभा निवडणूक 2024 निकाल) मतमोजणी सुरू आहे. यावेळी एक्झिट पोलमध्ये भाजपा सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक, सत्ताधारी एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात निकराची लढत असल्याचं दिसतंय. यावर उद्धव ठाकरे गटनेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसला मिळणार 150 हून अधिक जागा : नरेंद्र मोदी वाराणसीतून उभे आहेत. तिथंही नरेंद्र मोदी तीनवेळा मतमोजणीत मागं असल्याचं दिसून आलं. निवडणूकाचं दोन वाजेच्या सुमारास चित्र स्पष्ट होईल. इंडिया आघाडी वेगानं लीड घेत आहे. आघाडीनं एक्झिट पोलचे आकडे पार केले आहेत. इंडिया आघाडीनं बरीच मजल मारली आहे. माझ्या समजुतीनुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. ज्या काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत 50 जागाही मिळाल्या नाहीत. हा पक्ष आता 150 जागांच्या पुढे जाऊ शकतो, असं मला वाटतं.

'...मोदींचा निरोप समारंभ' : 'मला वाटतं काँग्रेसनं दीडशे जागा गाठल्या म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पार पडला. आमच्या अभ्यासानुसार महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढं असेल आणि इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळताना दिसत नाही. पण त्यावर चर्चा करायला अजून वेळ आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढं : 'महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाचा कल पाहता महाविकास आघाडीनं मोठी आघाडी घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेसचा उमेदवार 1 लाख मतांनी निवडून येणार आहे, असं राऊत म्हणाले की, बीडमध्येही बजरंग सोनवणे पुढं आहेत, मुंबईतही शिवसेना ठाकरे गटाचा मोठा विजय होत आहे'.

हे वाचलंत का :

  1. नवनीत राणा, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर; दिग्गजांना मोठा धक्का - Maharashtra lok Sabha election
  2. स्मृती इराणी 15000 हून अधिक मतांनी मागे, तर खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंग 50 हजार मतांनी आघाडीवर - Lok Sabha election results 2024
  3. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या 'या' बड्या नेत्यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार - Lok Sabha Election Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details