महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने डॉक्टरांनी फेकून दिले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती - Porsche car accident case

Pune car accident: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. यातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बदलून दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने दिल्याची खळबळजनक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Pune Police Commissioner Amitesh Kumar
आयुक्त अमितेश कुमार यांची खळबळजनक माहिती (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 1:22 PM IST

पुणे- Porsche car accident case: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फेकून दिले. त्या जागी दुसऱ्या व्यक्तीचे तपासलेले रक्ताचे नमुने ठेवण्यात आले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "१७ वर्षाच्या मुलाच्या रक्ताचे नमुने न तपासता दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

रक्ताच्या नमुन्यात फेरफार प्रकरणी दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक-अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याचा अंदाज येताच पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे हे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉ. श्रीहरी हलनोर हे शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे आहेत. येरवडा पोलीस स्टेशनने रविवारी रात्री उशिरा दोघांनाही रात्री अटक केली. दोन्ही डॉक्टरांना आज पुणे न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात प्रोडक्शन वॉरंट-रक्ताच्या तपासणी अहवालात अल्पवयीन मुलाच्या पित्याला अटक होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलाच्या पित्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. त्यानं रक्ताच्या तपासणीतसंदर्भात डॉ. अजय तावरेला फोन केला होता. पोलिसांना त्यासंदर्भात अल्पवयीन मुलाच्या पित्याची चौकशी करायची आहे.

रक्ताच्या तपासणीसंदर्भात कसे झाले फेरफार-अल्पवयीन आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने घेतले होते. पण ते रक्ताचे नमुने तेथील डॉक्टरांनी कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. दुसर्‍या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने वापरण्यात आले आहेत. पोलिसांकडून त्या व्यक्तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं. डॉक्टर श्रीहरी हरलोल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक - Pune Hit And Run Case
  2. दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी! - Maharashtra SSC Result 2024
  3. संजय राऊतांच्या दाव्यानंतर भाजपासह काँग्रेस उमेदवारही आक्रमक; वाद चिघळण्याची शक्यता - Anil Deshmukh on Sanjay Raut

ABOUT THE AUTHOR

...view details