महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानवतेला काळिमा! आठ वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला अटक - अल्पवयीन मुलाचं अपहरण

Unnatural abuse of a minor : पिंपरी चिंचवड शहरात एका अल्पयीन मुलावर अनैरसर्गिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तसंच, या नराधमानं मुलाची हत्याही केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली .

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 5:53 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पिंपरी चिंचवड :Unnatural abuse of a minor :पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील वाकड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना रविवार (दि. 25 फेब्रुवारी)रोजी वाकड येथे उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पवन जोगेश्वरप्रसाद पांडे (वय 31, रा. उत्तमनगर बावधन, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बेपत्ता झाल्याची तक्रार : पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पीडित मुलगा घराजवळ अंगणात खेळत होता. त्यानंतर काही वेळानं तो अचानक बेपत्ता झाला. बराचवेळ झाल्यावर मुलगा घरी परतला नाही म्हणून, आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला. मात्र, शोधाशोध करूनही तो न सापडल्यानं पित्यानं वाकड पोलिसांत आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल दिली. वाकड पोलिसांनीदेखील गुन्हा दाखल करत मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांना देखील मुलगा कुठेच आढळून आला नाही.

सीसीटीव्हीत आढळून आला : पोलिसांना मुलाचं अपहरण झाल्याचा संशय आला. पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची गती वाढवल्यानंतर वाकड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता मुलगा एका संशयित व्यक्तीसोबत पायी जात असताना दिसून आला. सीसीटीव्हीमध्ये आढळून आलेली संशयित व्यक्ती ही राधेश्याम बर्डे यांच्या ओळखीचीच निघाली. रसवंतीत कामाला असलेल्या पांडेची चौकशी करण्यात आली. पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. त्याआधारे पोलिसांनी संशयित पवन जोगेश्वरप्रसाद पांडे याला ताब्यात घेतलं.

मुलाची गळा दाबून हत्या केली : पवन जोगेश्वर पांडे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यानं अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला पाषाण येथील परिसरात नेलं. पवननं तिथे रात्रीच्या काळोखात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर आरोपी पवनने मुलाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपीनं हत्या केल्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह बावधान येथील कचऱ्याच्या ढिगाराजवळ फेकून दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details