महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूर पुन्हा हादरलं; रेल्वे स्थानकात अंदाधूंद गोळीबार, प्रवाशांना मोठा धक्का - Badlapur Firing - BADLAPUR FIRING

Firing at Badlapur Railway Station : बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली. भर गर्दीत अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झालाय.

Firing at Badlapur Railway Station
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 7:21 AM IST

Updated : Sep 6, 2024, 7:59 AM IST

ठाणे Firing at Badlapur Railway Station : बदलापूर इथल्या एका नामांकीत शाळेत दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळं बदलापूर शहर हादरलं. या घटनेनंतर शेकडो आंदोलकांनी घटनेच्या निषेधात रेल्वे रुळावर उतरत रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा बदलापूर रेल्वे स्थानक हादरलं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. चार अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला.

बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार (Source - ETV Bharat Reporter)

नेमकं प्रकरण काय? : बदलापूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी (5 सप्टेंबर 2024) प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चार जणांच्या टोळीकडून प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या दोघांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

एकाला घेतलं ताब्यात :गोळीबाराचा आवाज होताच रेल्वे स्थानकात एकच पळापळ होऊन प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. तर दुसरीकडं एका आरोपीनं गोळीबार करत तो रेल्वे रुळावरुन धावत असताना त्याच्या हातातील बंदूक रुळावरचं पडली. त्यामुळं इतर प्रवाशांनी एकत्र येत त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं.

जुन्या वादातून गोळीबार : घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला. गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा गोळीबार जुन्या भांडणाच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. विकास नाना पगारे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. तर शंकर संसारे असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गर्दीच्या वेळी अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्यामुळं प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा

  1. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं तीन मजुरांचा मृत्यू, 2 मजूर अतिदक्षता विभागात - Building Slab Collapse In Mumbai
  2. विनयभंगाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक वाहनातून उडी मारून फरार; पोलिसांची धावाधाव - Child Accused Escaped Police
  3. तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide
Last Updated : Sep 6, 2024, 7:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details