मुंबई Building Collapse In Mumbai : शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोरदार वाढला असून, अद्यापही मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच ग्रँड रोड इथल्या नाना चौकातील एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आणखी तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
ग्रँड रोड इथं इमारतीचा भाग कोसळला (Reporter) इमारतीचा काही भाग कोसळून महिलेचा मृत्यू :महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं माहितीनुसार, अग्निशमन विभागाला ग्रँड रोड रेल्वे स्टेशन पश्चिम शेजारील रुबीनिसा मंजिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती देणारा फोन आला. 11 वाजता ही घटना घडली. त्यानंतर ताबडतोब अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली. या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बाल्कनीचा भाग आणि स्लॅब कोसळला. तर, वरच्या चार मजल्यांच्या संरचनेचा भाग अर्धवट कोसळला होता. तर काही भाग वरचं अर्धवट लटकला. या इमारतीच्या डिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला.
इमारतीत अडकले होते 7 ते 8 नागरिक :सदर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 7 ते 8 रहिवासी अडकले होते. सध्या त्यांचं बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना नजीकच्या भाटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भाटिया रुग्णालयातील डॉक्टर रश्मी सर्व जखमींवर उपचार करत असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी अवस्थेत सापडले. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य तीन जणांवर उपचार सुरू असल्याची माहितीही महापालिकेनं दिली आहे.
महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून दिली होती नोटीस :दरम्यान, सदर इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सहा महिन्यांपूर्वीच ही इमारत धोकादायक असल्यानं इमारत खाली करण्याची नोटीस रहिवाशांना पाठवली होती. मात्र, तरी देखील अंदाजे 40 जण या इमारतीत राहत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.
हेही वाचा :
- Dombivli Building Collapse : तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
- Nerul Building Collapse: काम सुरू असताना कोसळला चार मजली इमारतीचा स्लॅब; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
- सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली : 7 जणांचा मृत्यू, रात्रीपासून बचावकार्य सुरू - Gujarat Building Collapse